शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील औंध परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 18:18 IST

औंध रस्ता येथील आंबेडकर वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देआढळून आला भारत आणि इंडेन गॅसच्या लहानमोठ्या १०५ गॅस सिलिंडरचा साठालहान सिलिंडरच्या ८५ टाक्या करण्यात आल्या हस्तगत

पुणे : पुणे : औंध येथील आंबेडकर वसाहतीत बेकायदेशीररित्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडर भरताना झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. भारत आणि इंडेन गॅसच्या लहानमोठ्या १०५ गॅस सिलिंडरचा साठा येथे आढळून आला.  वसाहतीत ओम साई गॅस सेल अ‍ॅण्ड सर्व्हिस नावाचे दुकान आहे. तेथे मोठ्या व्यावसायिक सिलिंडरमधून लहान-लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना अग्निशामक दलाचे जवान पोचण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या ठिकाणी १८ भारत गॅसच्या आणि २ इंडेन गॅसचे व्यावसायिक सिलिंडर आढळून आले. तसेच लहान सिलिंडरच्या ८५ टाक्या हस्तगत करण्यात आल्या. यातील काही सिलिंडरमधून गळती होत होती. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अग्निशामक दलाला दुर्घटनेची माहिती समजली. अग्निशामक दलाच्या आठ जवानांनी अपघातग्रस्त ठिकाणाकडे तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या पथकात अधिकारी बाळकृष्ण जिल्हेवार, शिवाजी मेमाने, बापू मुंगसे, संजय कार्ले, वासुदेव आल्हाट, बाळू तळपे, शिवाजी लोखंडे यांचा समावेश होता.

 

टॅग्स :Blastस्फोटPuneपुणे