शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने परत केली अडीच लाख असलेली बॅग

By admin | Updated: November 16, 2016 21:41 IST

नोटा बंदीमुळे सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच गरीब कष्टक-यांमधून मात्र प्रामाणिकपणाचे वस्तुपाठ घालून देणारी उदाहरणे समोर येत आहेत.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि 16 : नोटा बंदीमुळे सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच गरीब कष्टक-यांमधून मात्र प्रामाणिकपणाचे वस्तुपाठ घालून देणारी उदाहरणे समोर येत आहेत. वारजे परिसरात रिक्षामध्ये विसरलेली तब्बल अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केली. विशेष म्हणजे त्याच वेळी ही रोकड हरवल्याची तक्रार घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात पोचली होती. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मारुती एकनाथ मोरे (वय ६२, रा. गोकुळनगर, वारजे) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे त्यांची रिक्षा घेऊन बंगळुरु मुंबई बाह्यवळण रस्त्यावर प्रवासी थांब्यावर उभे होते. अहमदाबाहून आलेल्या तुलशी दिलीप गुप्ता (वय ५४, रा. पद्मावती) बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सिमला फाऊंडेशन येथे उतरल्या. त्या मोरे यांच्या रिक्षात बसल्या. त्यांना मोरेंनी वारजे चौकात सोडले. गुप्ता यांच्याकडून ममिटर प्रमाणे पैसे घेऊन मोरे पुढे निघून गेले. रिक्षा निघून गेल्यावर आपली अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोंधळलेल्या अवस्थेतच त्यांनी वारजे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना रिक्षामध्ये पैशांची बॅग विसरल्याची माहिती देत असतानाच मोरे पोलीस ठाण्यात पोचले. त्यांनी पोलिसांना आपल्या रिक्षात पैशांची बॅग विसरली असून ती ताब्यात घ्या असे सांगितले. पाचशे रुपयांच्या पाचशे नोटा असलेली ही बॅग पोलिसांकडे सोपवण्यात आली. दरम्यान, गुप्ता यांना मोरे पैसे घेऊन आल्याचे समजले. त्यांनी मोरे यांचे आभार मानत बॅग उघडून पाहिली तेव्हा आतमधील नोटा जशाच्या तशा होत्या. त्यामध्ये किंचितही बदल नव्हता. गुप्ता यांनी मालमत्तेच्या व्यवहारामधून मिळालेली ही रक्कम असल्याचे पोलिसांना सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी मोरे यांच्या प्रमाणिकपणाचे कौतुक केले.-------------------व्यवहारातील मोठ्या चलनी नोटांवर बंदी येताच आपल्याकडील काळ्या धनाचे करायचे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोणी नदी नाल्यात तर कोणी कच-यात या नोटा फेकून देत आहे. तर नोटा जाळतही आहे. मात्र, पुण्यामध्ये कष्टक-यांकडून प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिले जात आहेत. काही दिवसांपुर्वी कचरावेचक शांताबाई ओव्हाळ यांना कच-यात सापडलेल्या ५२ हजारांच्या नोटा त्यांनी पोलिसांकडे जमा केल्या होत्या. बुधवारी रिक्षाचालक मारुती मोरे यांनीही प्रामाणिकपणे अडीच लाख रुपये परत केले आहेत.