शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

तमाशापंढरीत दिवसभरात अडीच कोटींची उलाढाल

By admin | Updated: March 28, 2017 23:58 IST

लोकनाट्य तमाशाचे माहेरघर असलेल्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून

नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर असलेल्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून तमाशाखेळाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्या गर्दीमुळे तमाशा पंढरीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी दुष्काळी सावट असताना तमाशा क्षेत्राला चांगले वातावरण होते. मात्र यावर्षी नोटाबंदीचा फटका तमाशा बुकिंगवर दिसून आला आहे. दिवसभरात २५० हून अधिक सुपाऱ्या तमाशाखेळाच्या गेल्या असून दिवसभरात अडीच कोटी रुपयांची उलाढाल तर एक महिन्यात ६०० खेळाच्या सुपाऱ्या जाऊन सुमारे ५ कोटींची उलाढाल या तमाशापंढरीत झाली असल्याची माहिती तमाशा फडमालक बाळ आल्हाट नेतवडकर यांनी दिली़ गुढीपाडवा हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह नगर, नाशिक, ठाणे या भागातील गावकऱ्यांची गर्दी झाली होती. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ येथील ३० राहुट्यांमध्ये आले होते. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसासाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़, अशी माहिती विजय वाव्हळ, राजू सावंत, विशाल नारायणगावकर यांनी दिली .यंदाच्या वर्षी तमाशापंढरीत रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे करवडीकर, अंजली नाशिककर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू , भिका-भीमा सांगवीकर, बाळ आल्हाट नेतवडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकरसह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बढेसह नंदाराणी नगरकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक पुणेकर, कुंदा पाटील पुणेकर, काळू-नामू वेळवंडकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, संध्या माने सोलापूरकर, संभाजी जाधव संक्रापूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, ईश्वरबापू पिंपरीकर, छाया खिल्लारे बारामतीकर, भिका-भीमा सांगवीकर, मंगला बनसोडे करवडीकर, मनीषा सिद्धटेककर, नंदाराणी भोकरे साकुर्डीकर, वामनराव पाटोळे मेंढापूरकर, सर्जेराव जाधव दावडीकर, उषा पाटील खोमणे औरंगाबादकर, संगीता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर, पुष्पा बरडकर कृष्णा वाघमोडे, सुनीता बारामतीकरसह रमेश खुडे आदी तमाशा फडाच्या राहट्या उभारण्यात आलेल्या आहेत. आदी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या या तमाशापंढरीत उभारल्या आहेत़. सर्वाधिक सुपारी रघुवीर खेडकर गेली त्यांची कालाष्टमी आणि पौर्णिमा ३ लाखांला गेली. नारायणगाव येथे तमाशा फडाच्या ३० राहुट्या आहेत. एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाऱ्या बुक झाल्या आहेत़ (वार्ताहर)