शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

अक्षय्य तृतीयेदिवशी ५० कोटींची उलाढाल

By admin | Updated: April 23, 2015 06:33 IST

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सोने आणि वाहन खरेदीस मोठी तेजी होती. सदनिका व जमीन खरेदीसही पसंती दिली गेली. त्याचबरोबर इलेक्ट्रानिक्सच्या

पिंपरी : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सोने आणि वाहन खरेदीस मोठी तेजी होती. सदनिका व जमीन खरेदीसही पसंती दिली गेली. त्याचबरोबर इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू, कपडे, फर्निचरचे वस्तू मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्या. यामुळे शहरातील बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. मंगळवारी एका दिवसात संपुर्ण बाजारपेठेत ५० कोटीपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र आहे. सर्वांधिक तेजी सराफ पेढीत होती. सोने खरेदीस मोठी पसंती दिली गेली. पाठोपाठ सदनिका आणि जमीन खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले. दुचाकी आणि चारचाकी मोटार घेण्याचा कल शहरवासींयामध्ये वाढतच आहे. इलेक्ट्रानिक वस्तू, कपडे, फर्निचर आदी बाजारपेठेतही उत्साह जाणवला. शहरातील सर्वच सराफी पेढीत ग्राहकांची झुंबड होती. मंगळवारी एका दिवसात शहरातील ८०० च्या आसपास सराफी पेढीत सोन्यांच्या दागिण्यांची एकूण उलाढाल तब्बल २५ कोटीच्यावर झाल्याचा अंदाज आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी घेतलेले सोने वाढत जाते अशी श्रद्धा आहे. तसेच, बारा वर्षांनंतर मंगल योग साधून आला होता. यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे नागरिकांनी सोने खरेदी केले. यामुळे गेल्या काही दिवसामध्ये आलेली मरगळ दूर झाली. गेल्यावर्षी ३० हजार रुपये तोळे असा सोन्याचा भाव होता. काल तो २६ हजार ७०० ते २७ हजार ५० होता. या संधीचा लाभ अनेकांनी उठविला. सराफी दुकाने नागरिकांनी गजबजली होती. दागिणे खरेदी करण्यास मोठा कल होता.पूर्वी सोने गुंतवणूक म्हणून खरेदी केले जात होते. वेढणी, बिस्कीट, कॉइन या स्वरुपात सोने घेतले जात होते. मात्र, बाजारपेठेत सोन्याचे दर घटत असल्याने सध्या गुंतवणूकीसाठी सोने खरेदीचे प्रमाण घटले आहेत. दागिणे म्हणून सोन्यास सर्वांधिक पसंती दिली गेली. शहरात एकूण ८०० सराफी पेढी आहेत. काही राष्ट्रीयस्तरावरील मोठ्या पेढ्याची दालने शहरात आहेत. मंगळवारी एका दिवसांत सोन्याची एकूण उलाढाल २५ कोटीच्यावर झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या उत्साहामुळे सराफी बाजार तेजीत आला आहे. मावळात जमीन खरेदीस प्राधान्यमावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, कामशेत, आंबी, रांजणवाडी आदी भागांत जमीन विक्रीचे योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बीएसएनएलची इंटरनेट यंत्रणा विस्कळीत झाल्याने व्यवहार पुर्ण करण्यात अडचणी आल्या. काही ठिकाणी व्यवहार झाले नाहीत. (प्रतिनिधी)