शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

बावड्यात तुकोबारायांचे जंगी स्वागत

By admin | Updated: June 29, 2017 03:29 IST

टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले.वारकरी पंढरीचा ।धन्य धन्य जन्म त्याचा ।।इंदापुरातून विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती इ. गावांचा पाहुणचार स्वीकारीत पालखी दुपारी येथे दाखल झाली. त्या वेळी उदयसिंह पाटील, प्रशांत पाटील, किरण पाटील, विकास पाटील, मयूरसिंह पाटील, महादेव घाडगे, अ‍ॅड. कमलाकांत तोरणे, सरपंच निरुपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे, संतोष सूर्यवंशी आदी प्रमुख ग्रामस्थांनी वेशीत पुष्पहार अर्पण करून तोफांची सलामी दिली. श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिंडी काढली होती. त्यामध्ये मुला-मुलींनी वारकऱ्यांची वेषभूषा केली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष व डोक्यावर तुळशी वृंदावन यामुळे विद्यार्थी दिंडी अधिक तेजोमय दिसत होती. पालखीबरोबर चालत येथील ब्रह्मर्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात रथ येताच दर्शनासाठी झुंबड उडाली. त्यानंतर रथातून पालखी उतरवून खांद्यावर मुख्य पेठेतून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व ग्रामस्थांनी वाहून नेली. बाजारतळ प्रांगणात सजवलेल्या शामियान्यात दर्शनासाठी ती ठेवण्यात आली. पुरुष व स्त्रियांसाठी वेगळ्या दर्शनाची सोय केली होती.दुपारी विश्रांती घेऊन पालखी सराटी मुक्कामी नीरा नदीकाठी रवाना झाली. पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असून उद्या पहाटे नीरास्नानानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेश करील. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी वारीत पायी प्रवास केला. बावडा येथे रत्नाई निवासस्थानी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, सचिन कांबळे यांनी सकाळी आंबेडकर चौकात नाश्त्याची व चहापानाची सोय केली होती. छोट्या-मोठ्या मंडळींनीही वारकऱ्यांची सेवा केली. आरोग्य विभाग ग्रामपंचायतींच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या.