शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगरावरील यंदाचा माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 12:49 IST

जगदगुरु संत तुकोरायांना गुरुंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला ही पवित्र तिथी म्हणजे माघ शुध्द दशमी.

देहूगाव : जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकोबारायांची चिंतनभूमी, तपोभूमी असणाऱ्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुध्द दशमीच्या निमित्ताने होणारा अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रद्द केला आहे. 

जगदगुरु संत तुकोरायांना गुरुंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला ही पवित्र तिथी म्हणजे माघ शुध्द दशमी. वारकरी सांप्रदायात या माघ शुध्द दशमीला आगळे वेगळे महत्व आहे. या निमित्ताने गेली ५० वर्षे श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे वसंत पंचमी ते माघ शुध्द त्रयोदशीपर्यंत विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट तर्फे अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व किर्तन महोत्सव होत असतो. दरवर्षी या गाथा पारायण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील भाविकांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातील भाविक सहभागी होत असतात. माघ शुध्द दशमीच्या पवित्र तिथीला दोन ते तीन लाख वारकरी व भाविक दर्शनासाठी येत असतात. 

या वैश्विक महामारीच्या संकटकाळात विविध सण व धार्मिक उत्सव संपूर्ण देशभरच साधेपनाने साजरे केले जात आहेत. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील या वर्षीचा दिनांक १६ ते २४ फेब्रुवारीला माघ शुध्द दशमीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे असे श्री विठ्ठल- रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी जाहिर केले आहे. .

.........श्री विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट च्या बैठक झाली. यावेळी नैमित्तीक विधी, अभिषेक, पुजापाठ, हरीपाठ आदी कार्यक्रमांसह अत्यंत साधेपनाने करण्यात येणार आहेत. ...............गर्दी करू नये जिल्हा प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या सुचनांचे व नियमावलीचे काटेकोरपने अमंलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांनी या सप्ताह कालावधीमध्ये भंडारा डोंगरावरील सर्व कार्यक्रम व अन्नप्रसाद रद्द केल्यामुळे दर्शनासाठी गर्दी करु नये. -बाळासाहेब काशिद, अध्यक्ष, विठ्ठल- रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant tukaramसंत तुकारामcorona virusकोरोना वायरस बातम्या