शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:25 IST

एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे - एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे मिलिंद एकबोटे यांचे ज्येष्ठ बंधू व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी स्पष्ट केले.कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी येरवडा कारागृहात कोरेगाव भीमाप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्याशी एका व्यक्तीची गोपनीय भेट घडवून आणल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. ठाणे मध्यवती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी या संदर्भात राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, एकबोटे कुटुंबीयांनी जाधव यांची तक्रार बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा पुरावा आढळत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आमचा भाऊ सरळमार्गी आहे. मीही त्यांना कारागृहात भेटण्यासाठी रांगेत उभे राहून पास काढला. जाळीतून आमची भेट झाली.स्वाती साठे यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांची ओळख असण्याचा प्रश्नच नाही. जाधव हे सेवेतून बडतर्फ असून एका प्रकरणात त्यांनी साठे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या भांडणात आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केली आहे. जे बडतर्फ झाले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यामुळे त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विनाकारण मिलिंद एकबोटे यांना अडकविले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.मिलिंद एकबोटे हे १५ वर्षे नगरसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार गायींचे रक्षण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दैवत आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप लेखही लिहिले आहेत. क्रांतिवीर लहुजी प्रतिष्ठानमार्फत आतापर्यंत त्यांनी ५० हजार दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांचे ८० टक्के कार्यकर्ते दलित आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. - डॉ. गजानन एकबोटे

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेnewsबातम्या