तळेगाव ढमढेरे : देशात खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशी तत्त्वे अंगीकारली तरच देशाची संस्कृती जोपासली जाईल. त्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांइथनी केले.तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आंतर विद्याशाखीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. एकनाथ खांदवे व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी भारताच्या जडणघडणीत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राच्या बीजभाषणात सप्तर्षी बोलत होते. या वेळी डॉ. शुभांगी राठी, डॉ. एकनाथ खांदवे, डॉ. केतन गोवेकर, विद्या सहकारी बॅँकेचे संचालक महेश ढमढेरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाबळे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, उपप्राचार्य पराग चौधरी, प्रा. पद्माकर गोरे, प्रो. सोमनाथ पाटील, डॉ. संदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले की, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आदर्श घेऊन समाजाने अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यांच्याविरोधात जागरूक होऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.
संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करा
By admin | Updated: January 23, 2016 02:30 IST