पुणे : सध्याच्या नव्या पिढीला जे पाहिजे, ते सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कष्ट करण्याची वृत्ती नाहीशी होत चालली आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत जो जिद्दीने काम करून यश संपादन करतो, तोच खरा कलाकार असतो. मुलांनी स्पर्धक म्हणून मुळीच स्पर्धा करू नये. उलट कलाकार होण्यासाठी अंगात अभिजात कला रुजविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांनी येथे केले. ‘आर्टीेट्यूड’ संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय, भरतनाट्यम आणि कथक नृत्य, शास्त्रीय गायन तसेच नाट्यछटा आदी स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी झाला. ‘आर्टीट्यूड’ संस्थेचे संचालक विश्वास महाजन, प्रमुख संचालिका स्मिता महाजन उपस्थित होते.विजेते : भरतनाट्यम अ गट : प्रथम ईशान्वी पटवर्धन, द्वितीय इशिता लेले तृतीय शाश्वती वझे, उत्तेजनार्थ सागरिका पटवर्धन. ब गट : प्रथम साई उभे, द्वितीय सताक्षी जोशी, तृतीय आदिती दहितुले आणि केतकी शिंगणापूरकर, उत्तेजनार्थ पल्लवी मालवकर. कथक अ गट : प्रथम मृण्मयी सामदेकर, द्वितीय जुई रानडे, तृतीय तन्वी पाठक. ब गट : प्रथम सानिका जोशी, द्वितीय मधुरा गोडबोले व अनन्या कुलकर्णी, तृतीय तनया देशपांडे. (प्रतिनिधी)
अभिजात कलेसाठी प्रयत्न करा
By admin | Updated: February 16, 2016 01:09 IST