शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

 मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याच्या तयारीत असलेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 20:01 IST

"दारूमुक्त महाराष्ट्र"च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्यापूर्वीच तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून शनिवारी दुपारी ताब्यात घेतले.

पुणे : "दारूमुक्त महाराष्ट्र"च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्यापूर्वीच तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून शनिवारी दुपारी ताब्यात घेतले.महाराष्ट्रात दारूमुळे महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत , तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे सरकारने तत्काळ दारू बंदी करावी या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या मुख्यमंत्र्यांना दारुच्या बाटल्या दाखवून निषेध व्यक्त करणार होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे शहरात आगमन होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात मोठ्या उत्साहात या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे. महाजनादेश यात्रा जाणाऱ्या मार्गावर ठिक ठिकाणी पोस्टर्स आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. संपूर्ण पुणे शहर स्वागतासाठी तयार असतानाच भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र  "दारूमुक्त महाराष्ट्र "च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्याचे ठरविले होते.भुमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्या दाखवून दारूच्या बाटल्यांचा हार अर्पण करून निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून  सहकारनगर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.तृप्ती देसाई म्हणाल्या आम्ही सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध करीत असून आमचा विरोध सहन होत नाही तर मुख्यमंत्र्यांनी महिलांचे उध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी तरी महाराष्ट्रात दारूबंदी तातडीने करावी. आज पोलीसांकडून आम्हाला तुम्ही ताब्यात घेतले पण लवकरच गनिमी काव्याने आम्ही दारूच्या बाटल्यांचा हार मुख्यमंत्र्यांना घालणारच असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसArrestअटक