पुणे : कल्याणीनगर येथे उभारण्यात आलेल्या ट्रम्प टॉवरमध्ये जागतिक दर्जाच्या पातळीवर काम झाले आहे. प्रेक्षणीय आणि अद्भुत असे त्याचे वर्णन करावे लागेल. अगदी हा प्रकल्प न्यूयॉर्क आणि लंडनला उचलून नेल्यास, तेथेही तो सामावून जाईल. अगदी सिनिअर ट्रम्प (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प)देखील या प्रकल्पाने भारावून गेल्याचे डोनाल्ड ट्र्म्प ज्युनिअर यांनी बुधवारी सांगितले.ट्रम्प जुनिअर यांनी बुधवारी पुण्याला भेट देऊन कल्याणीनगरमधील ट्र्मप टॉवर २ चे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते दोन सदनिकाधारकांचा सत्कार करण्यात आला. पंचशील रिअॅलिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते. ट्रम्प जुनिअर म्हणाले, की प्रथमच मी पुण्याला भेट दिली. येथील बांधकाम पाहिले. खरोखरच आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरेल असे काम करण्यात आले आहे. अतिशय प्रेक्षणीय असे स्थळ येथे निर्माण करण्यात यश आले आहे. माझ्या वडिलांनीदेखील सुरुवातीच्या टप्प्यात येथे भेट दिली होती. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून थकलेल्या अवस्थेत ते आले होते; मात्र येथील काम पाहिल्यानंतर अत्यंत उत्साहित झाले होते. अपेक्षेपेक्षा अधिक चांगलेकाम उतरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
ट्रम्प टॉवरने सिनिअर ट्रम्पदेखील भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:17 IST