शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:15 IST

पुणे: लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी ७३ व्या लष्कर दिनानिमित्त ...

पुणे: लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी ७३ व्या लष्कर दिनानिमित्त राष्ट्रीय युद्धस्मारक येथे पुष्पचक्र अर्पण हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

भारतील लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के. एम. करिअप्पा, ओबीई यांनी भारतीय सैन्याची धुरा हाती घेतल्याच्या स्मरणार्थ लष्कर दिवस साजरा केला जातो. ‘भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम आहे’ ही या वर्षीच्या सैन्य दिनाची संकल्पना आहे.

दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी युद्धात हुतात्मा झालेल्या वीर सैनिकांना पुष्पचक्र अर्पण केले. आर्मी कमांडर यांनी सर्व पदाधिकारी, वीरांगना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या. मातृभूमीचे अंतर्गत आणि बाह्यविरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना काळातही शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी आणि सर्व आव्हाने पेलण्यासाठी लष्कराचा दक्षिण विभाग सदैव कार्यरत होता आणि भविष्यातही राहील, असे मोहंती म्हणाले.

------

जनजागृती मोहिमेचे आयोजन

दक्षिण विभाग मुख्यालयाद्वारे ‘भारतीय लष्कर विविधतेत एकतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती मोहिमेचे आयोजन १९ ऑक्‍टोबर २०२० ते १० जानेवारी २०२१ दरम्यान केले होते. व्हिडीओ तयार करणे, चित्रकला, घोषवाक्‍य लेखन आणि छायाचित्रण या प्रकारांत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील ५२ पारितोषिकांपैकी पुणेकरांनी पाच वैयक्तिक पारितोषिके पटकाविली. मोहंती यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

----

फोटो : स्पर्धेत यशस्वी झालेल्यांना बक्षिस देताना लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती.