शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:27 IST

महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान ( आॅक्सिजन पार्क ) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देमहापालिका वनविभाग व सामाजिक संस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर महापालिका बजेटमध्ये आर्थिक तरतूद तळजाई टेकडीचे वैभव ठरणारी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण

पांडुरंग मरगजे लोकमत न्यूज नेटवर्क धनकवडी : पुणे महानगरपालिकेच्या तळजाई टेकडीवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची संख्या तशी बरीच आहे. उद्यानातील शेकडो देशी वृक्षांची निगा राखण्याचे वन विभाग व पालिकेला विसर पडू लागल्याने शेकडो वृक्ष वाळून त्यांचा ऱ्हास होऊ लागल्याने निसर्गप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दक्षिण पुणे उपनगर परिसराला मोकळा श्वास व आॅक्सिजन देणाऱ्या बरीच झाडी नष्ट होत चालली असून लाखो रुपये अनुदान मिळत असतानाही या वृक्षसंपदेचे जतन केले जात नसल्याने नागरिकांमध्ये वनविभाग व पालिका प्रशासन याबाबतीत नाराजी निर्माण होत आहे. जवळपास साडेसहाशे एकर परिसरात विस्तार असलेल्या पाचगावपर्वतीचा हा परिसर एक प्रकारे दक्षिण पुण्याचे निसर्ग संपदेचा एक बहुमोल ठेवाच आहे.महापालिका वनविभाग व सामाजिक संस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. महापालिका बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूदही केली जाते. अनेक सामाजिक संस्था व संघटना देखील स्वनिधीतुन वृक्षारोपण करत असताना या झाडांची देखभाल करण्यासाठी मात्र वनविभाग व पालिका उद्यान विभागाची उदासीनता दिसुन येते. जवळपास साडेसहाशे एकर क्षेत्रापैकी वनविभागाकडे तीनशे एकर क्षेत्र आहे. बाकीचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे आहे. वृक्षारोपण केल्यानंतर खऱ्या अर्थाने देखभाल करायला हवी ती केली जात नसल्याने महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान (आॅक्सिजन पार्क) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत. यातील आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, यासारखे पूर्ण वाढ झालेली व जैववैविध्यातेला बळकट करू करणारी शेकडो झाडे वाळून चाली आहेत. निसर्ग प्रेमी व विविध सामाजिक संस्था व संघटनांनी स्वखर्चाने लावलेल्या झाडांना तर कोणी वालीच राहिलेला दिसत नाही या झाडांची खुपच दुरावस्था झाली आहे. तळजाई टेकडीचे वैभव ठरणारी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभाग व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वनसंपदेचा हा ठेवाच नष्ट होत असल्यामुळे निसर्गप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.

तळजाई टेकडीचा विकास व सुधारणा करण्यासाठी आजपर्यंत काही कोटी रुपए खर्च करण्यात आले असून येथील चंदनाची झाडे चोरीस जात आहेत, विसाव्यासाठी असलेल्या बाबांची तोडफोड होत आहे. भटक्या कुत्र्यांचा व डूकरांचातर सुळसुळाट झाला असून निसर्ग प्रेमी व तळजाई भ्रमणासाठी येणायांना देखील त्यांच्यापासुन धोका निर्माण होऊ लागला आहे. अलिकडच्या काळात वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून तळजाई टेकडी व येथील वनसंपदा वन व पालिका प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे संकटात सापडत चालली आहे असेच म्हणावे लागेल. राज्याचा वनविभाग पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेचा नेहमीच डांगोरा पिटत असतो. सामाजिक संस्था व नागरिकांना सतत यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत असतात. मात्र, लोकांचे सहभागातून झालेल्या वृक्षलागवडीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकार आणि पालिका  झाडे लावा झाडे जगवा या आपल्याच संकल्पनेला हरताळ फासत असल्याचे तळजाई टेकडीकडे पाहिल्यावर दिसुन येत आहे........................ सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले,  पाचगाव पर्वती हा खूप मोठा विस्तीर्ण भाग हा त्याच्या सिमा भिंती बंदिस्त करण्याचे काम टप्पा टप्प्याने सुरू आहे. अजून चार किलोमीटर ची सिमा भिंती बांधण्याचे काम बाकी आहे. ते पुढील वर्षीत पुर्ण होईल. मात्र आता ज्या ठिकाणी सिमा भिंत नाही तेथून भटकी कुत्री , डुक्कर आत मध्ये येऊन नासधूस होते. त्याचप्रमाणे काही उपद्रवी व्यक्तींच्या हलगर्जीपणामुळे आग लागण्याचे प्रकार ही घडत आहेत. तसेच वन कर्मचारी छोट्या झाडांना नियमितपणे पाणी देत असतात. परंतु मोठी झालेली झाडे ही पावसाच्या पाण्यावरच असतात. झाडे वाळून गेली असतील तर तशी पाहणी करून उपाययोजना केल्या जातील. ..........................दरवर्षी महापालिका टेंडर काढून गवत (तण) काढून टाकत होती. मात्र मागील दोन वर्षांपासून महापालिका वाढलेले गवत (तण) काढण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व त्यामुळे वणवा लागून झाडांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे पुर्वी ३८ सुरक्षा रक्षक होते. त्यांची संख्या कमी केली असून आवश्यकता आहे तेथे हे सुरक्षा रक्षक काम न करता अनावश्यक ठिकाणी काम करताना दिसतात . त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. सुभाष जगताप, नगरसेवक ..........................

टॅग्स :DhankawadiधनकवडीTaljai Tekdiतळजाई टेकडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाforest departmentवनविभाग