शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वरवेत ट्रॅव्हलर बस उलटली, एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:30 IST

पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावाच्या हद्दीत पहाटे एकच्या दरम्यान नवलाई ट्रॅव्हर्लची आरामगाडी महामार्गालगत पलटी झाल्याने या अपघातात एक जण ठार तर अन्य १२ जण जखमी झाले आहेत.

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावाच्या हद्दीत पहाटे एकच्या दरम्यान नवलाई ट्रॅव्हर्लची आरामगाडी महामार्गालगत पलटी झाल्याने या अपघातात एक जण ठार तर अन्य १२ जण जखमी झाले आहेत.सहायक पोलीस निरीक्षक मोहन तलबार यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ज्ञानेश्वर महादेव थोरात (वय २९, रा. माळशिरस) यांचा मृत्यू झाला तर संतोष श्रीमंत कदम (वय ३६, रा. डोंगरगाव, सोलापूर), शिरीष मिरोकोर (रा. पनवेल, मुंबई), उत्तम साळमाडगे (वय २३, लोणार, मंगळवेढा), अभिजित साळमाडगे (वय ५, रा. लोणार, मंगळवेढा), श्रीमंत मुरुमले (वय ५९, रा. घेरडी, सांगोला), वंदना यादव (वय ४४, रा. बुड, सांगली), मयूरी खुडे (वय २६, रा. शेगाव, जत), विजय विठ्ठल बाबर (वय २७, रा. डोंगरगाव, सोलापूर), संतोष सौदागर चव्हाण (वय २९, रा. सोनन, सांगोला), मीराबाई तुकाराम हिप्परकर (वय ४०, रा. शिगमळा, जत), अधिराज माने (वय १, रा. वीरनाड, जत), लतिका तानाजी इंगळे (वय ४२, रा. फरेवाडी, ता. मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत. या सर्वांना नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडले असून जखमीपैकी तिघे गंभीर जखमी आहेत, ते उपचार घेत आहेत. नवलाई ट्रॅव्हलर्सची आरामगाडी कळंबोली येथून सुटल्यानंतर खेड-शिवापूर टोलनाका सोडल्यानंतर वरवे गावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बसचालकाच्या बाजूस एका अंगावर पलटी झाली.

टॅग्स :Accidentअपघात