शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल एजंट संघटनेचे ‘व्यावसायिक मॉडेल’

By admin | Updated: October 12, 2016 02:55 IST

पर्यटन क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणे’ या पर्यटन व्यावसायिकांच्या

पुणे : पर्यटन क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणे’ या पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेने आयएसओच्या धर्तीवर एक व्यावसायिक मॉडेल तयार केले आहे. यामध्ये संघटनेच्या सदस्यांना ग्राहकांना सेवा देताना पाळावयाची नियमावली तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहाकांना चांगली सेवा मिळण्याबरोबरच त्यांची फसवणूकही टळणार आहे. पर्यटन क्षेत्राचा अनुभव नसणारे अनेक जण या क्षेत्रात येत असल्याने फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच आॅनलाईन पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधातही ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. या सर्वांचा परिणाम प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल एजंटांच्या व्यवसायावर होत होता. त्यामध्ये संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच त्यांचा विश्वास वाढण्यासाठी व्यावसायिक सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आयएसओच्या धर्तीवर संघटनेने सदस्यांसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. सेवा देण्याचे एक व्यावसायिक मॉडेल सवार्नुमते तयार करण्यात आले आहे. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणेचे संचालक नीलेश भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मॉडेल पूर्णत: ग्राहकाभिमुख ठेवण्यात आले आहे. एखादा नवीन व्यावसायिक दाखल झाला तर त्याचे शॉप अ‍ॅक्ट लायसेन्स, सेल्स टॅक्स नंबर व इतर कागदपत्रांची खात्री करून घेतल्यानंतरच त्याला संघटनेचे सदस्य केला जाईल. सेवा देणाऱ्या प्रत्येक एजंटला त्याने दिलेल्या सेवेच्या दर्जानुसार नामांकित करण्यात येणार आहे. डिफॉल्टर कंपनींची माहितीही यापुढे संघटनेच्या सदस्यांमध्ये शेअर केली जाणार आहे. या डिल्फॉल्टर कंपनीला संघटनेत स्थानही दिले जाणार नाही. तसेच बिल थकविणाऱ्या ग्रांहकाची नावे ही सर्व ट्रॅव्हल कंपन्यांकडे दिली जाणार आहेत. (प्रतिनिधी)