शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियोजन खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:29 IST

रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसामुळे पडलेली झाडे आणि अचानक बंद पडलेल्या बसेस या कारणांमुळे शहरातील विविध रस्त्यांवर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसामुळे पडलेली झाडे आणि अचानक बंद पडलेल्या बसेस या कारणांमुळे शहरातील विविध रस्त्यांवर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अधूनमधून बरसणारा पाऊस, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा आणि लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा याचा फटका वाहनचालकांना बसला. गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने चारचाकी गाड्या अधिक प्रमाणात रस्त्यावर उतरल्या आहेत. यातच दर पावसाळ्यात पूर्वनियोजनाचा गोषवारा करूनही रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहनचालकांच्या त्रासात दिवसागणिक भरच पडत आहे. या परिस्थितीमध्ये गुरुवारचा दिवस पुणेकरांची खऱ्या अर्थाने परीक्षा पाहणारा ठरला. शिवाजीनगर भागातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते जंगली महाराज दरम्यान झाड पडल्याने त्या परिसरातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहनचालक एकाच ठिकाणी थांबून होते. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्त्यावरील वाहतूककोंडीचा सर्व ताण विधी महाविद्यालय रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहचालक खूप काळ अडकून पडत होते. कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. वानवडी भागात बस बंद पडल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. पावसाच्या सरींमुळे वाहतूक अधिकच मंदावली होती. वारजे-कात्रज सर्व्हिस लेन, पाषाण, चतु:शृंगी तसेच दत्तवाडी, म्हात्रे पूल, स्वारगेट, कोंढवा, केशवनगर चौक, गोळीबार मैदान अशा विविध भागांमध्ये वाहतूककोंडी झाली होती. पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविण्याची वेळ येत होती. सिग्नल यंत्रणाही काही भागांत बंद पडल्याने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक पाहायला मिळत होती. एकंदरच वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे दिसून आले.