शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियोजनाचा उडाला बोजवारा

By admin | Updated: April 22, 2017 04:08 IST

शहरातील वाहतुकीचे नियोजन, आराखडा तयार करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आदींची जबाबदारी असलेल्या महापालिका वाहतूक नियोजन विभागाच्या

- दीपक जाधव,  पुणेशहरातील वाहतुकीचे नियोजन, आराखडा तयार करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आदींची जबाबदारी असलेल्या महापालिका वाहतूक नियोजन विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे शहरातील वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. चुकलेले उड्डाणपूल, दुभाजकांची दुरवस्था, अतिक्रमणांमुळे चौकात तयार झालेले बॉटलनेक, सिग्नल व्यवस्थित न चालणे आदींमुळे वाहतूक समस्येने गेल्या काही वर्षांत अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाहतूक नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, ढिसाळ कारभार यामुळे रस्ते शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत़शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. वाहनांच्या वाढलेल्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढली नाही. त्यामुळे पुणेकरांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे कोंडीत अधिक भर पडत आहे.शहर वाढत असताना भविष्यातील वाहतूक समस्यांचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पालिकेकडून झाले नसल्याने या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांना अभियंता दिलाच नाहीवाहतूक पोलीस रस्त्यावर असलेल्या मर्यादित सोयी-सुविधांचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती वाहतूक पोलिसांना असत नाही. त्यामुळे खूप अडचणी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक विभागाला वाहतूक अभियंता (ट्रॅफिक इंजिनिअर) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सातत्याने केली आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सेवेत अनेक तज्ज्ञ अभियंते असताना त्यांना कारकुनी कामात गुंतवून ठेवले आहेत. श्रीनिवास बोनाला यांच्या कारकिर्दीतच वाहतुकीचे वाजले बारामहापालिकेमध्ये गेल्या २० वर्षांपासून श्रीनिवास बोनाला ट्रॅफिक प्लॅनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बढती मिळत आता ते मुख्य अभियंता (प्रकल्प) पदावर पोहोचले आहेत. मात्र, शहरातील वाहतुकीच्या नियोजनामध्ये बोनाला फारसे योगदान देऊ शकले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीतच शहराच्या वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. निष्क्रिय कारभारामुळे ते कायम वादग्रस्त राहिले आहेत. त्यांच्या कारभारावर पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी अनेकदा टीकेची झोड उठविली. काही सदस्यांनी तर बोनाला यांना पालिकेने काहीही काम न करता फुकट पगार द्यावा, पण त्यांच्याकडील वाहतूक नियोजनाची जबाबदारी काढून घ्यावी, अशी सूचना केली होती. मात्र बोनाला यांची नियुक्तीच ट्रफिक प्लॅनर म्हणून झाली असल्याने त्यांची प्रशासनाला दुसरीकडे बदलीही करता आली नाही. उलट सेवाज्येष्ठतेनुसार ते पालिकेच्या मुख्य अभियंतापदी (प्रकल्प) पोहोचले आहेत.सल्लागारांवर कोट्यवधींचा खर्च, अधिकारी करतात आराममहापालिकेच्या प्रकल्प विभागातील वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांना लाखो रुपयांचा पगार महापालिकेकडून दिला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या ज्ञानाचा पालिकेला काहीच उपयोग होताना दिसून येत नाही. प्रकल्प विभागाकडून प्रत्येक कामासाठी सल्लागार कंपनी नेमली जाते. या सल्लागांराना कोट्यवधी रुपयांचे शुल्क पालिकेकडून दिले जाते. पालिकेने बनविलेले उड्डाणपूल अथवा दुसऱ्या एखाद्या प्रकल्पात काही चूक झाल्यास ती जबाबदारी सल्लागारावर ढकलली जाते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ‘पगार मोठा मात्र काम काहीच नाही,’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. - वाहतूककोंडीमध्ये सातत्याने अडकून पडावे लागणे, सिग्नलला खपूच जास्त वेळ थांबवे लागणे यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातून वाहतुकीचे नियम तोडण्याकडे कल वाढत आहे. चौका-चौकांत बॉटलनेकअतिक्रमणे व इतर काही कारणांमुळे शहरात अनेक ठिकाणी बॉटलनेक तयार होऊन वाहतूककोंडी होत आहे. वस्तूत: बॉटलनेक तयार होणार नाही किंवा झाले तरी ते दूर करण्याची जबाबदारी वाहतूक नियोजन विभागाची आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक नियोजन विभागाकडून काहीच प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत नाही.अनेक उड्डाणपुलांची बांधणी चुकीचीप्रचंड रहदारी असलेल्या शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्यात आले. मात्र त्यापैकी अनेक उड्डाणपुलाची बांधणी चुकल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलावरून औंध, बाणेर, पाषाणकडे जाण्याची सुविधा देण्यात आली. मात्र तिकडून शिवाजीनगरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी कायम राहिली आहे. याच प्रकारे कर्वे रोड, हडपसर येथील उड्डाणपुलांची चुकीची बांधणी झाली आहे.