पुणो : कायद्यातील तरतुदीनुसार हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करत आहोत, मग पोलिसांच्या गाडयांवरील पिवळे दिवे काढून निळे दिवे बसविण्याच्या आदेशाची 8 महिने झाली, तरी अंमलबजावणी का करीत नाहीत, असा प्रश्न पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना विचारण्यात आला. त्यावर ‘परिवहन आयुक्तांनी आमच्या गाडय़ांचे दिवे बदलण्याचे आदेश दिले आहेत, तर त्यांनीच येऊन त्याची अंमलबजावणी करावी,’ असे धक्कादायक उत्तर दिले.
नागरिक चेतना मंचच्या वतीने सतीश माथूर यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. हेल्मेटसक्तीच्या अनुषंगाने माथूर यांना पोलिसांनी त्यांच्या गाडय़ांचे दिवे बदलले नसल्याचे निदर्शनास आणून त्याचे कारण विचारल्यावर परिवहन आयुक्तांनीच त्याची अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.
माथूर म्हणाले, ‘‘ वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहनचालकांना केला जाणारा दंड हा मोटार वाहन अॅक्टनुसार गोळा केला जातो. त्यामध्ये वाढ करायची असेल, तर कायद्यांमध्ये बदल करावे लागतील. ते आमच्या हातात नाही.’’
रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची स्थिती ठिक नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
कायद्याचे पालन
सर्वानी केलेच पाहिजे
पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आम्ही काही नियमांचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही गटांकडून त्याला विरोध केला जात आहे, हे चुकीचे आहे. कायद्याचे पालन सर्वानी केलेच पाहिजे, असे सतीश माथूर यांनी हेल्मेटसक्तीचा प्रत्यक्ष उल्लेख न करता स्पष्ट केले.
राज्य शासनाने शासकीय वाहनांवर वापरले जात असलेल्या दिव्यांच्या वापरात सुसूत्रता यावी, याकरिता एका समितीमार्फत अभ्यास करून कुणी कोणते दिवे वापरावेत, याचे निकष ठरवून दिले आहेत. त्याबाबतचा अध्यादेश 4 एप्रिल 2क्14 रोजी काढण्यात आला आहे. पोलीस उपायुक्तांसह त्यांच्या खालील सर्व पोलीस अधिका:यांच्या मोटारींना असलेले पिवळे दिवे काढून निळे दिवे बसविण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या आदेशानुसार पोलीस अधिका:यांनी त्यांच्या मोटार वाहन विभागातून स्टिकरसह दिवे बसवून घेणो बंधनकारक आहे.