शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:00 IST

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुणे : स्मार्ट सिटीअतंर्गत नक्की काय कामे सुरु आहेत, कामांची निवड परस्पर केली जाते, प्रकल्प निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विचारात घेतले जात नाही, बैठकांना बोलाविले जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. यामध्ये त्वरित सुधारणा करा, संबंधित आमदार, नगरसेवकांच्या दर महिन्याला बैठका घ्या, कामरभार पादर्शक झाला पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सध्या शहरात सुरू असलेले व भविष्यात नव्याने सुरू करण्यात येणाºया प्रकल्पाची माहिती व चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, आयुक्त सौरभ राव, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमांबाबत लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही, बैठकांसाठी बोलविले जात नाही, रस्ते किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे प्रकल्प राबविताना विचारात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. यापुढे संबंधित आमदार, नगरसेविकांच्या नियमित बैठका घेऊन माहिती द्या, तसेच मी स्वत: दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन स्मार्ट सिटीचे काय काम सुरू आहे, आढावा घेणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.जगताप म्हणाले, की स्मार्ट सिटीला गेल्या दोन वर्षांत ३०१ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यामध्ये १९४ कोटी केंद्र शासन, ९८ कोटी राज्य शासन आणि १०१ कोटी पुणे महापालिकेकडून उपलब्ध झाला आहे. यापैकी आतापर्यंत ११७ कोटींचा खर्च केला असून, तब्बल ४८० कोटींच्या कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या आहेत. तर आता पर्यंत १२ कामे पूर्ण झाली असून, २६ कामे सुरु आहेत. नव्याने १७ कामांचे टेंडर करण्यात आली असून, सात कामांचा डीपीआर करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवास्मार्ट सिटी असो की पुणे महापालिका गेल्या काही वर्षांत प्रत्येक कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीने दोन वर्षांत सल्लागारांवर ३० ते ४० कोटी खर्च केले आहेत. या सल्लागारांनी काय कामे केली, जबाबदारी काय, किती कामे पूर्ण केली, याची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांना दिले.शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागारांचे सल्ले घेऊन केलेली अनेक कामे फसली असल्याचे शहरात झालेल्या उड्डाणपुलांच्या कामांवरून स्पष्ट होईल. त्यामुळे सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची बिलं देताना नक्की काय काम केले व शहराला उपयोग झाला का, याची खात्री केली पाहिजे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे