शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कार्यप्रणालीत येणार पारदर्शकता, एनएसएसमधील कामकाज आॅनलाइन : गैरप्रकारालाही बसणार आळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:59 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. तसेच एनएसएसच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमहदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्यातच राज्य शासनाने एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे याबाबतची नियमावलीत तयार केली आहे.त्यामुळे पुढील काळात एनएसएसच्या माध्यमातून नियोजनबध्द पध्दतीने काम होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एनएसएसच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती राज्य शासनाला विद्यापीठातर्फे पाठविली जाणार आहे. एनएसएस विभागातर्फे विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.त्यामुळे २०१६-१७ मध्ये नोंदविलेल्या एनएसएसच्या स्वयंसेवकांच्या माहितीमधून २०१७-१८च्या एनएसएसच्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ठ केले जाणार आहे. काही कारणास्तव द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला तर त्यांच्या जागी प्रथमवर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक बंधनकारक४विद्यापीठातर्फे एनएसएसच्या विद्यार्थी संख्येनुसार महाविद्यालयांना निधी दिला जातो.त्यामुळे काही महाविद्यालयांनी अधिक विद्यार्थी असल्याचे सांगून निधी लाटल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात होती. मात्र,विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला.तसेच आॅनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी दाखवून निधी लाटता येणार नाही. परिणामी एनएसएसमधील गैरप्रकाराला आळा बसणार आहे.विद्यापीठाच्या राट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यापीठाच्या एनएसएस कार्यालयातर्फे महाविद्यलयांकडून आॅनलाईन प्रस्ताव स्वीकारले जाणारआहेत. तसेच संबंधित प्रस्तावांना आॅनलाईनच मंजुरी दिली जाईल.आॅनलाईन मंजुरीमुळे महाविद्यालय व विद्यापीठाची वेळेची बचत होणार आहे.तसेच सर्व कामकाज ‘पेपर लेस’होणार आहे.त्याच प्रमाणे एनएसएस अंतर्गत केल्या जाणा-या सर्व कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ