शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच

By admin | Updated: April 30, 2015 00:33 IST

घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे.

पुणे : ‘घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे. चालकांवर झडप घालून गर्दीच्या वेळीही दंडवसुली करण्यात येत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनचालकांच्या दंडाच्या पावत्या फाडण्यापेक्षा वाहतूक नियमनावर भर द्यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात दिले आहेत. यासोबतच वाहतूक नियमन आणि दंडवसुलीकरिता स्वतंत्र कर्मचारी नेमण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत. परंतु, शहरातील मुख्य चौकांसोबतच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून अद्यापही नियमनापेक्षा दंडवसुलीलाच अधिक महत्त्व देण्यात येत असल्याचे दिसते. सध्या शहरात सगळीकडे रस्त्यांची खोदाई सुरू आहे. त्यामुळे अरुंद असलेले रस्ते अधिकच छोटे झाले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत चालली आहे. रस्ते व पार्किंगच्या जागा खोदून ठेवल्यामुळे वाहने लावण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. या सर्वांचा भुर्दंड वाहनचालकांनाच सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)४वाहतूक पोलीस दंडवसुलीमध्ये मग्न झाल्यामुळे चौकांमध्ये काही वेळातच वाहतूककोंडी व्हायला सुरुवात होते. ४वाहनांच्या रांगा लागायला लागतात. बुधवारी दिवसभरात शहराच्या मध्यवस्तीतील अभिनव महाविद्यालय चौक, बाबा भिडे पूल आणि जयंतराव टिळक पुलावर वाहतूक पोलीस घोळक्याने उभे असलेले आणि दंडाच्या पावत्या फाडत असल्याचे दिसून आले.