शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:29 IST

चिंचवड स्टेशन : पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही नाही परिणाम

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील अवैध प्रवासी वाहतूक व्यवसाय पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर थांबेल, असे वाटत असतानाच आयुक्तालयाच्या समोर अगदी बिनबोभाटपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने या गुंड प्रवृत्तीच्या वाहनचालकांना पोलिसांचे अभय असल्याची चर्चा आहे. १५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरू झाल्यानंतर येथील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठोस पावले उचलली, तसेच गहन बनलेल्या वाकड, हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्नही सोडविण्यात आला. त्यांना यश आले, तर वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी अवैध र्पाकिंग आणि कलम २७९ वर त्यांनी जोर धरत धडक कारवाई मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांनावठणीवर आणले. वाहतूक समस्येसाठी प्रसिद्ध असलेल्या आयुक्तांनी चिंचवड येथील अवैध प्रवासी वाहतुकीकडेदेखील जरा वाकडी नजर करून पाहण्याची आता गरज आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात चिंचवड येथील आॅटो क्लस्टर इमारतीत सुरू असून, आयुक्तालय या स्टँडपासून हाकेच्या अंतरावर आहे, तर पिंपरी पोलीस ठाण्याच्या अगदीसमोर ही अवैध वाहतूक सुरू असताना पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष कसे असू शकते? या स्टँडमुळे येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अवैध वाहतूक करणारे वाहनचालक आडव्या-तिडव्या मोटारी लावून वाहतूककोंडीत भर घालतात.शहराला औषधांचा पुरवठा करणारा प्रसिद्ध दवा बाजारदेखील येथेच आहे, तसेच नामवंत रुग्णालये येथे असून, या बेशिस्त मोटारींमुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिका व रुग्णांना आडकाठी येते. येथे पदपथदेखील उरले नसल्याने पादचाºयांना जीव मुठीत धरून नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झालाआहे.या स्टँडवर अनेकदा वर्चस्ववादातून भांडणे-हाणामारी व वाहनांची तोडफोड यांसारख्या असंख्य घटना नेहमी घडतात. येथील झटपट मिळणाºया पैशांमुळे भाईगिरी फोफावत चालली आहे. छेडछाडीच्या घटनादेखील येथे घडल्या आहेत. मनमानी पद्धतीने तिकीट आकारले जाते. या सर्व प्रकाराची आणि मोटारींच्या कागदपत्रांची तपासणी करण्याऐवजी येथील वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प आहेत. तथाकथित एजंट कमिशनवर या मोटारी भरून देण्याचे काम करतात. मालधक्का रोड, दवाबाजार, रेल्वे स्टेशन रोड, जयश्री थिएटर, एस. टी. स्टँड या तीन वेगवेगळ्या स्टँडवर सुमारे सव्वाशे मोटारी येथे असतात. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी