शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर

By पवन देशपांडे | Updated: September 29, 2018 00:51 IST

‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.

पुणे - ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. तसेच, जागतिक क्रमवारीत विद्यापीठाला ५०१ ते ६०० या गटात स्थान मिळाले आहे. विद्यापीठाने यंदा तब्बल २०० क्रमांकांनी झेप घेतली आहे.जगातील विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांचे त्यांच्या सर्व क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारे ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर केली जाते. या संस्थेने २०१९साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. शिक्षण संस्थांसाठी ही क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते. अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय, इतर १३ महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते.या क्रमवारीमध्ये पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१६ पासून सहभागी होत आहे. मागील तीन वर्षे विद्यापीठाचा समावेश पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात होत होता. त्यात मोठी सुधारणा होऊन आता विद्यापीठ पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात आले आहे.जागतिक क्रमवारीत सुधारणा झाल्याने देशपातळीवरही विद्यापीठ आघाडीवर आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या स्थानावर आहे. तर, सर्व संस्थांमध्ये संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरच्या जेएसएस अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या वैद्यकीय विद्यापीठाचा समावेश आहे.‘नॅशनल इन्स्टिट्युशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने (एनआयआरएफ) नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत विद्यापीठाचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६मध्ये तिसरा, तर २०१७मध्ये दुसरा क्रमांक आला होता. २०१८मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपरिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.

अध्यापन, संशोधन आदी निकषांवर निर्णयजागतिक क्रमवारीत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आतापर्यंत ६०१ ते ८०० या गटातून आम्ही ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात पोहोचलो आहोत. आता पुढचा टप्पा पहिल्या ५०० विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे.- डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‘टीएचई’ने अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीयदृष्टीकोन, सायटेशन, उद्योगांकडून उत्पन्न अशाविविध निकषांच्या आधारे मुल्यमापन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकुण ३३.५ते ३७ गुण मिळाले आहेत. अध्यापनामध्ये विद्यापीठ ३८.८ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिले.संशोधनामध्ये विद्यापीठाला कमी गुण मिळालेआहेत. देशात विद्यापीठ १७ व्या क्रमांकावर असून केवळ १५.४ गुण मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व उद्योगाकडून उत्पन्न या गटांमध्ये अनुक्रमे १७.६ व ३५.६ गुणांसह विद्यापीठ २३ व्यास्थानावर राहिले.देशातील ‘टॉप’ संस्था (कंसात जागतिक क्रमवारी)१. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, बंगळुरू (२५१-३००)२. आयआयटी, इंदूर (३५१-४००)३. आयआयटी, मुंबई (४०१-५००)४. आयआयटी, रुरकी (४०१-५००)५. जेएसएस अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च(४०१-५००)६. आयआयटी, दिल्ली (५०१-६००)७. आयआयटी, कानपूर (५०१-६००)८. आयआयटी, खरगपूर (५०१-६००)९. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (५०१-६००)

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या