शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पारंपरिक तमाशा फड कर्जाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:05 IST

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.

- भरत निगडेनीरा -  पूर्वी गावातील जत्रांची शान असणारा तमाशा काळाच्या ओघात मागे पडला आहे. कुण्या गावाचं आलं पाखरू... याभावजी...बसा रावजी, सोळावं वरीस धोक्याचं यांसारखी कायम तोंडी गुणगुणली जाणारी पारंपरिक गीते आजही लोकप्रिय आहेत; मात्र या दोन दशकांचा विचार करता जनमानसाच्या हृदयावर राज्य करू शकतील अशी नवीन गीते तमाशात पुन्हा निर्माण झाली नाहीत किंवा लोकप्रिय झाली नाहीत. पूर्वीच्या तुलनेत तमाशांच्या फडाचे प्रमाण कमी झाले असून, तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला चांगले दिवस होते. त्यानंतर ८०च्या दशकात तमाशा मंडळे वाढली. विसाव्या शतकाच्या पूर्ततेपर्यंत तमाशा मंडळांची संख्या; तसेच लोककलावंतांचा आदर मानसन्मान होत होता.मात्र, गेल्या ही लोककलेला मारक ठरली. पाशात्य नृत्यप्रकारांची तरुणांवर असलेली भुरळ, मराठी, तमीळ, हिंदी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर झालेली निर्मिती तसेच वाढती चित्रपटगृहे यांकडे जनमानसाचा कल राहिला. त्यानंतर तमाशा केवळ यात्रा किंवा जत्रेचा एक औपचारिक भाग म्हणून आणला आणि पहिला जाऊ लागला. चौफुल्यासारखी ठिकाणे हळूहळू गर्दी कमी खेचू लागली. त्यातही तमाशाचा नाद वाईट! घराचं, जमीनजुमल्याचं पार वाटोळे असा प्रघात पडला आणि पांढरपेशी माणूस तमाशापासून दुरावला.एक लोककला म्हणून तमाशाकडे पाहण्याची जनमानसाची दृष्टी हरवत चालली. मात्र याचा परिणाम सर्वच तमाशा फडांवर झाला. आधीच कर्ज काढून सुरु केलेली तमाशा मंडळे ओस पडू लागली. सुपारी मिळविण्यासाठी यात्रा काळात राहुट्या उभारल्या जाऊ लागल्या. तिकिटांवरचे खेळ कमी झाले. चौफुला, कोल्हापूर यांसारखी गावांची नावे लोककलेशी निगडित राहिली. मात्र, या काळात शासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन कलावंत या क्षेत्रात येण्याचे प्रमाण प्रचंड घटलेले पाहायला मिळते.कर्ज मिळण्यास अडचणीतमाशा सुरु करण्यासाठी त्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नाही. मोठ्या भांडवलदाराला गाठून सहकर्जदार म्हणून तमाशा फड चालक कर्ज काढतात. आजही मोठ्या तमाशांच्या बाबतीत १०० ते १५० लोकांचा संसार तमाशावर चालतो. यात्रा काळात तमाशांना मागणी असते. चार महिन्यांचा काळ सोडला तर उर्वरित आठ महिने बसून काढण्याची वेळ कलावंतांवर येते. या काळात काही न काही बिदागी कलावंतांना मालकांकडून मिळते मात्र या बिदागीपोटी तमाशा मालक आणखीन कर्जात बुडालेले पाहायला मिळतात.शासनाच्या मदतीची अपेक्षाआजकाल आॅर्केस्ट्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे रात्री दहा नंतर खेळ करता येत नाहीत. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईत तमाशा पाहायला चांगला वाटतो. मात्र दुपारच्या वेळेत आॅर्केस्ट्राची सुपारी घेण्याकडे गावांचा कल वाढत आहे. यामुळे तमाशाची फरफट होत असून शासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकnewsबातम्या