शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : विविध संकल्पना, रचना तसेच हस्तकलांचा वापर करीत पर्यावरणपूरक कपड्यांची केलेली निर्मिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मॉडेलचा सहभाग, मेहनतीचे चीज होताना बघून विद्यार्थिनींनी केलेला कल्ला आणि त्याच्या जोडीला परंपरा व आधुनिकतेचा अनोखा मिलाफ यांनी परिपूर्ण असलेला फॅशन शो रंगला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जाधवगढ येथे.महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारतातील नामवंत फॅशन डिझाईनर हेमांग अग्रवाल, प्रसिद्ध फॅशन डिझाईनर केन फर्न्स, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध वरिष्ठ फॅशन जर्नालिस्ट मेहेर कॅसलिनो, अरविंद लाईफस्टाईलचे मेहुल पांचोली, यूकेमधील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर बेन रॅम्सडेन, इटलीमधील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर साशा परीक्षक म्हणून उपस्थित होते.पर्यावरणपूरक फॅशन ही मुख्य संकल्पना घेऊन महाराष्ट्र माझा व इको लक्झरी या संकल्पनेवर आधारित या फॅशन शोमध्ये डिझायनिंगच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी १६ विविध संकल्पनांवर आधारित केलेली वस्त्रप्रावरणे या फॅशन शोमध्ये सादर करण्यात आली. फॅशन कोरिओग्राफर वहबीझ मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या फॅशन शोमध्ये पार्वती ओमनीकुट्टन, कँडीस पिंटो, सुचेता शर्मा सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)यांना मिळाले पारितोषिक४फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ब्लेम द ब्लूम या संकल्पनेवर आधारित फॅशन कलेक्शनला मेंटर अ‍ॅवॉर्ड, गोल्डन एज या फॅशन कलेक्शनला बेस्ट कलेक्शन अ‍ॅवॉर्ड मिळाले. तर, शर्टीझम या कलेक्शनला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक फॅशन कलेक्शन अ‍ॅवॉर्ड मिळाले. ४ फॅशन डिझाईन अँड क्लोदिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अ‍ॅन इंडिजीनीअस एपिक या संकल्पनेवर आधारित फॅशनला मेंटर अ‍ॅवॉर्ड, रिफ्लेक्टीव्ह रिफॉर्मेशन या फॅशन कलेक्शनला बेस्ट कलेक्शन अ‍ॅवॉर्ड आणि कोड आॅफ लव्ह या फॅशन कलेक्शनला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक फॅशन क्लेक्शन अ‍ॅवॉर्ड म्हणून परीक्षकांची पसंंती मिळाली.