शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

वाळू व्यावसायिकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: June 23, 2016 02:19 IST

वाळू काढण्याच्या कारणावरून व्यावसायिकांच्या दोन गटांत श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर येथे मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत

इंदापूर : वाळू काढण्याच्या कारणावरून व्यावसायिकांच्या दोन गटांत श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर येथे मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. परस्परांविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या आहेत. नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय हनुमंत काळे, हनुमंत पांडुरंग काळे, प्रवीण हनुमंत बोराडे, लखन मारुती जाधव, नागेश बापू काळे, श्रीहरी लक्ष्मण मासुळे, बच्चन दिलीप धोत्रे, नीलेश ऊर्फ मामा जालिंदर कोळी, सागर अण्णा मासुळे (सर्व रा. नीरा नृसिंहपूर, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीहरी मासुळे, नीलेश कोळी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इंदापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश कोळी व हनुमंत काळे यांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. बच्चन धोत्रे, सागर मासुळे वगळता इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजी सरपंच असणारा आरोपी हनुमंत काळे हा त्याचा मुलगा अजय काळे,लखन जाधव, नागेश काळे, प्रवीण बोराडे यांच्या समवेत भीमा नदीवरच्या शेवरे गावाकडे जाणाऱ्या बंधाऱ्याजवळ वाळू काढत होते. नीलेश कोळी हा राहुल धोत्रे, सागर धोत्रे, नीलेश भोसले, स्वप्नील शिरसट, हरिदास मासुळे यांच्या समवेत तेथे गेला. वाळू काढल्यामुळे बंधारा फुटून पाणी वाहून जाते. त्यामुळे वाळू काढू नका, असे कोळी याने काळे यास सांगितले. त्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अजय काळे याने शिवीगाळ करीत, ‘आत्ता तुम्हाला खलासच करतो’ असे म्हणत, जवळच्या तलवारीने श्रीहरी मासुळे याच्या डोक्याच्या मागील बाजूवर वार केला. हनुमंत काळे याने कोळी याच्या कमरेवर तलवारीने वार केले. काठ्या व लोखंडी गज काढून कोळी व त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. आरडाओरडा झाल्यानंतर ग्रामस्थांनी भांडणे सोडवली, असे नीलेश कोळी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हनुमंत काळे याने दिलेल्या फिर्यादीत , आपण वाळू काढत असताना, गावातील श्रीहरी मासुळे, बच्चन धोत्रे, मामा कोळी, सागर मासुळे हे तेथे आले. वाळू काढायची नाही, असे सांगून ते शिवीगाळ , मारहाण करू लागले. त्यांच्या घरातून तलवार व लोखंडी रॉड आणले. मासुळे याने आपल्या डाव्या खांद्यावर तलवारीने वार केला, तर कोळी याने आपल्या मुलाच्या डोक्यात मध्यभागी लोखंडी रॉड मारला. त्यानंतर ते जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले,असे काळे याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)वाळूउपशाला आरोपीचे संरक्षण ?यातील फरारी आरोपी बच्चन धोत्रे हा कालठण नं. १ चा रहिवासी आहे. त्याने वाळूउपशाला संरक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मध्यंतरी कालठण येथे वाळू कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या वार्ताहरास त्याने बेदम मारहाण केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्षवाळूउपशामुळे पुरातन अशा लक्ष्मी-नृसिंह मंदिरास धोका पोहोचत आहे. त्यामुळे तेथे वाळूउपसा करण्यास बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास सक्त सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतीने ही वाळूउपसा होऊ नये, असा ठराव केला मात्र, या घटनेमुळे वाळू व्यावसायिक कुणालाही जुमानत नाही हे स्पष्ट झाले.