शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुल विद्यालयाची केरळला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:30 IST

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील युवक-युवतींनी केडगाव बाजारपेठेमध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून २१ हजार रुपये जमा केले. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, प्राचार्य डॉ. गोविंदराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी आठवडेबाजाराचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बाजारातील भाजीविक्रेते, भेळविक्रेते, ...

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील युवक-युवतींनी केडगाव बाजारपेठेमध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून २१ हजार रुपये जमा केले. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, प्राचार्य डॉ. गोविंदराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी आठवडेबाजाराचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बाजारातील भाजीविक्रेते, भेळविक्रेते, धान्यविक्रेते, व्यावसायिक यांच्याकडून लोकवर्गणी गोळा केली.

महाविद्यालयाच्या मदतपेटीतही अनेकांनी यथाशक्ती मदत जमा केली. यावेळी प्राचार्य निंबाळकर म्हणाले, केरळ येथील पूरग्रस्तांसाठी व मयत व्यक्तींच्या कुटुंबीयाप्रती संवेदना म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमाला सहकार्य म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी एका दिवसाचे वेतन असे मिळून ३५ हजार रुपये देणार आहेत. सामाजिक बांधिलकीमधून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रा. शाम वासनिकर, डॉ. राऊत ज्ञानदेव, डॉ. महादेव थोपटे, प्रा. भाऊसाहेब दरेकर, प्रा. दत्तात्रय खराडे, डॉ. नानासाहेब जावळे, प्रा. अमोल शेलार, प्रा. गणेश निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.ही घ्या माझी फुलं नाही फुलाची पाकळीबाजारपेठेत महाविद्यालयीन युवती फिरत असताना एका भाजी विक्रेत्याजवळ मदतीसाठी आल्या. यावेळी भाजीविक्रेत्याने आपल्या खिशातील ५ हजार रुपये मदत दिली.४युवतींनी या भाजीविक्रेत्याला नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास हात जोडून नकार दिला. आपण राष्ट्रबांधणीचे काम करत आहात, असे म्हणत भाजीपाला विक्री सुरू केली.

टॅग्स :Puneपुणे