शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 03:09 IST

आरोपीच्या आईने दिली होती पीडितेच्या कुटुंबीयांना जगू न देण्याची धमकी

पुणे : खेळण्यासाठी परिसरातील एका घरात जात असलेल्या दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यातील मोठ्या बहिणीवर वारंवार बलात्कार तर छोटीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. ही बाब आईवडिलांना सांगितली, तर त्यांना मारून टाकण्याची धमकी देत त्याने मुलींवर अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली या अल्पवयीन असून त्यातील मोठ्या मुलीचे वय १० आणि छोट्या मुलीचे वय ८ आहे. अकबर इमाम शेख (वय १९, रा. किराड गल्ली, भवानी पेठ) असे शिक्षा देण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी हा प्रकार उघड झाला होता.घटनेच्या दिवशी फिर्यादी यांची छोटी मुलगी ही शेख याच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादी या घरातील कामे करीत होत्या. त्यांना अचानक मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून त्या शेख याच्या घरात गेल्या. त्यावेळी शेख पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी पाहिले. फिर्यादी यांनी त्वरित मुलीची सुटका केली आणि तिला घरी घेऊन गेल्या.रात्रीच्या वेळी फिर्यादी यांनी ही बाब पतीला सांगितली. त्यानंतर त्यांनी मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन शेख याच्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिच्याकडून देखील सुमारे २० दिवसांपासून अकबर घरी खेळण्यासाठी गेल्यानंतर अत्याचार करीत असल्याची माहिती मिळाली. ही बाब आईवडिलांना सांगितली तर त्यांना जिवे मारण्याची धमकी त्याने मुलींना दिली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार शेख याला अटक करून त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी सहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. राजेश कावेडिया यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलींची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युुक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने शेख याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी. दंडाची रक्कम न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.शेखच्या आईलाही शिक्षाअकबर याने केलेल्या प्रकाराबद्दल पीडित मुलींचे आईवडील त्याची आई शेहनाझ इमान शेख हिच्याकडे जाब विचारला. त्या वेळी तुम्हाला येथे राहायचे असेल तर गप्प बसा, नाहीतर मुलींना घेऊन दुसरीकडे जा. याबाबत, पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला जगू देणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणात तिला दोषी ठरवत न्यायालयाने १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तिला एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळ