शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

लाचलुचपत सापळ्यात ‘पालिका’ अव्वल, दहा वर्षांत सर्वाधिक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:54 IST

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील ३५ सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या १२५ कारवायांपैकी सर्वाधिक २३ कारवाया या पुणे माहापालिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे.

- विशाल शिर्केपुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील ३५ सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या १२५ कारवायांपैकी सर्वाधिक २३ कारवाया या पुणे माहापालिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. पाठोपाठ महावितरण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा क्रमांक लागतो.पुणे विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत गेल्या दहा वर्षांत पोलीस विभाग वगळता शहरातील विविध ३५ सरकारी विभागांतील अधिकारी-कर्मचाºयांविरोधात १२५ सापळे रचले. त्यात १४७ व्यक्तींवर कारवाई झाली आहे. यात पुणे महापालिकेतील कारवायांचा क्रमांक अव्वल लागतो. महापालिकेत दहा वर्षांत २३ कारवाया करण्यात आल्या असून, त्यात ३१ जणांवर कारवाई झाली. त्यामध्ये उपअभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लिपिक अशा विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ७ कारवायांमध्ये सात जणांवर कारवाई झाली आहे.महावितरणमध्ये १४ कारवाया करण्यात आल्या असून, त्यात सुपरींटेन्डन्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांसह वायरमनचादेखील समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ८ कारवायांत ९ जण जाळ्यात अडकले आहेत. समाजकल्याण आणि जिल्हा परिषदेत प्रत्येकी ७, जिल्हाधिकारी कार्यालय ६, नगर भूमापन कार्यालयात ५, अन्नधान्यमध्ये दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. विक्रीकर कार्यालयात ४, क्रीडा, धर्मादाय, जिल्हा रेशीम कार्यालय, आदिवासी विकास मंडळ, वैधमापन शास्त्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवाजीनगर येथील विधी व न्याय मंडळात प्रत्येकी १ कारवाई करण्यात आाली. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अहजर खान यांनी ही माहिती उघड केली आहे.शहरातील अशा विविध ३४ कार्यालयांतील १२५ प्रकरणांत केवळ १२ प्रकरणांमध्ये १७ जणांवरील दोष सिद्ध करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. त्यामध्ये महसूल विभागातील दुय्यम निबंधक आणि वकील, महापालिकेच्या घोले रस्ता कार्यालयातील कर संकलन विभागातील कारकून, मिळकत व्यवस्थापक, गृहविकास क्षेत्र विभागातील लिपिक, भवानी पेठेतील कर संकलन विभागातील लेखनिक आणि महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलावर दोषनिश्चिती झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सहायक, ससूनमधील मुख्य औषध भांडार अधिकाºयावर लाचेचा गुन्हा सिद्ध झाला.सव्वाशे प्रकरणांपैकी ५० मध्ये निर्दोष सुटकालाचलुचपत प्रतिबंक विभागाने २००७ नंतरशहर, पिंपरी-चिंचवडमधील विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांवर केलेल्या १२५ कारवायांपैकी ५२ प्रकरणांत आरोपींची निर्दोष सुटका झाली.त्यातील ५० प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, ११ प्रकरणांचा तपास सुरूआहे. तर, अवघ्या १२ प्रकरणांत आरोपींचा दोष सिद्ध होऊनत्यांना शिक्षा झाली आहे.अन्न व औषध कार्यालात अन्न निरीक्षक, उत्पादनशुल्क विभागात निरीक्षक वर्ग-२, यूएलसी कार्यालय स्वारगेट येथे वर्ग ३, पाटबंधारे कार्यालयात वर्ग दोन, जातपडताळणी विभागात सहायक संचालक, पशुधन पर्यवेक्षण कार्यालयात वर्ग ३ दर्जाच्या अधिकाºयावर कारवाई करण्यात आली. मत्स्यव्यवसाय कार्यालयात वर्ग १, क्रीडा अधिकारी वर्ग ३, रेशीम अधिकारी, संशोधन अधिकारी आदिवासी विकास मंडळ, सहायक वनरक्षक-मामलेदार कचेरी, निरीक्षक-वैधमापन शास्त्र विभाग भवानी पेठ, अनुरेखक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, विवाह नोंदणी अधिकारी, सहसंचालक कामगार विभाग वर्ग १, बेलीफ शिवाजीनगर न्यायालय येथे एकदाच कारवाई झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झालेल्या एका कारवाईत उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी आणि एका खासगी इसमावर कारवाई करण्यात आली होती.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड