दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, लिंबू या पालेभाज्यांचे बाजारभाव त्याचप्रमाणे मका, बाजरी यांचे दर स्थिर निघाले. कोथिंबीर, कार्ली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांचे बाजारभाव तेजीत निघाले. हरभऱ्याची आवक घटून बाजारभावातही घट झाली. ज्वारीच्या आवकेत घट होऊन बाजारभाव तेजीत निघाल्याची माहिती सभापती रामभाऊ चौधरी, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१० किलोंप्रमाणे) : टोमॅटो (४०) ३२-८०, वांगी (३१) ३०-६०, दोडका (२) १००-२५०, भेंडी (५) १७०-२५०, कारली (१०) १२०-२५०, हिरवी मिरची (२३) ७० ते १००, गवार (३) २५० ते ५००, भोपळा (३५) २० ते ४०, काकडी (२३) ६० ते १००, कोथिंबीर (८७४० जुड्या) २५० ते ९००, मेथी (३८७० जुडी) २००-५००.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२४७) १६०० ते २१७६, ज्वारी (११) २२२२ ते ३११५, बाजरी (८०) १२०० ते २०००, मका (२८) १३०० ते १४२१, लिंबू (१११) १०० ते १७०, सोयाबीन (३) २५५१ ते २५५१.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४४१) १७३० ते २३५०, ज्वारी (३५२) २०००-२७५०, बाजरी (७७६) १२५० ते १९०१, हरभरा (६३) ४५०० ते ५०००, मका लाल/पिवळा (१२१) १३५० ते २१२५, तूर (१७५) ३६००-३९००, सोयाबीन (३) २६०० ते २७००, लिंबू (३५३) १७५ ते ३७०.पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२९) १६०१ ते २२००, ज्वारी (७) २२०२-२८००, बाजरी (४३) १२०१ ते १७०२, मका (५) १२४१ ते १७६१, मका (५) १२४१-१७६१, तूर (१८) ३५५१-३७५१.यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२७) १६५१ ते २५११, ज्वारी (११) २३५१ ते २९००, बाजरी (३८) १२११ ते २२०१, तूर (१) ३७०१ ते ३७०१, सोयाबीन (१) २४७५ ते २४७५ लिंबू (८०) १०० ते १८०.(वार्ताहर)
टोमॅटो, वांगी, मिरचीचे दर स्थिर
By admin | Updated: February 8, 2017 02:46 IST