शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

स्थायी समितीच्या अध्यक्षांची आज निवड

By admin | Updated: March 29, 2017 02:54 IST

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस

पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांच्यात लढत होत आहे. समितीच्या १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपाचे असल्याने मुरलीधर मोहोळ यांची निवड निश्चित आहे. स्थायी समिती निवडणुकीसाठी २४ मार्च रोजी नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मतदान होऊन स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली. महापौर, उपमहापौरपदाप्रमाणेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक विरोधकांकडून लढविली जात आहे. स्थायी समितीमध्ये भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०४, काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी १ असे १६ सदस्य आहेत. सर्व पक्षांनी एकत्र येऊन स्थायी समितीची निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार का, याची उत्सुकता असणार आहे.(प्रतिनिधी)30 मार्चला अंदाजपत्रक बुधवारी स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेच गुरुवारी (दि. ३०) आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. पक्षीय बलाबलभाजपा १०राष्ट्रवादी काँग्रेस०४काँग्रेस ०१शिवसेना ०१एकूण सदस्य १६