शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आज एसपीव्हीची पहिली बैठक

By admin | Updated: April 18, 2016 03:06 IST

महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) पहिली बैठक

पुणे : महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) पहिली बैठक सोमवारी सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. एसपीव्हीची ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये कंपनीचे आर्थिक वर्ष निश्चित करणे, अध्यक्षांना अधिकार देणे, कंपनीच्या प्राथमिक खर्चांना मान्यता देणे, तातडीच्या प्रकल्पांना मान्यता देणे, कोणते प्रकल्प सुरू करता येतील याबाबात निर्णय घेणे, शेअर्स वितरणाचा निर्णय घेणे, कंपनीचा अधिकृत शिक्का तयार करणे, बँकेत खाते उघडणे, कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संमतीने बँक व्यवहारांना मान्यता घेणे, सल्लागार कंपन्यांचे मार्गदर्शन घेण्याबाबत अध्यक्षांना अधिकार देणे आदी निर्णय घेतले जाणार आहे.एसपीव्हीच्या संचालक मंडळामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यासह ६ लोकप्रतिनिधांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्त, केंद्र व राज्य शासनाचे प्रतिनिधी संचालक मंडळात असणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून देण्यात येणारा दोन वर्षांचा १९४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.कंपनीचा मोनोग्राम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तयार करून संचालक मंडळापुढे सादर करावा. शासनाकडील ठराव ११ एप्रिल व १२ एप्रिलच्या पत्रांची नोंद घ्यावी. शासनाकडून नियमांमध्ये होणाऱ्या बदलाबाबतची नोंद संचालक मंडळाने घेऊन यासंदर्भात खास सभा बोलावून संचालक मंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.