शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आज स्नेहीजनांचा मेळा

By admin | Updated: December 28, 2016 04:29 IST

वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवित १७ वर्षे पूर्ण करून, १८व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे

पुणे : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवित १७ वर्षे पूर्ण करून, १८व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त साधण्यासाठी उद्या बुधवार (दि़२८) सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़गेल्या १७ वर्षांत पुणेकरांच्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात प्रथम क्रमांकाच्या दैनिकाचे स्थान मिळविले आहे. अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सातत्याने जागर मांडला आहे. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यांसारख्या मोहिमांमधून वाचा फोडली. नागरी समस्यांना वाचा फोडल्यामुळे प्रशासनावर विधायक अंकुश निर्माण झाला व त्यांना या प्रश्नांची दखल घेणे भाग पडले व अनेक प्रश्न मार्गीदेखील लागले. त्यातून ‘लोकमत’ने पुणेकरांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यांसारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिला सन्मानाची चळवळ बनला आहे. वृत्तपत्र म्हणजे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कला अन् विद्येच्या या माहेरघरात या परंपरेला साजेशी भूमिका घेतल्यानेच पुणे शहरात ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरूडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे़ ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)