शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाची नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 20:50 IST

शहरामध्ये सुमारे ९ लाख नोंदणीकृत मिळकती आहे. यामुळेच महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १ हजार ८१० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे...

ठळक मुद्देआतापर्यंत अकराशे कोटी जमा; अखेरचे पंधरा दिवस शिल्लक वर्षभरामध्ये ७०० व्यावसायिक मिळकती सील गतवर्षी महापालिकेला मिळकत करातून १ हजार ८४ कोटी रुपये

पुणे: महापालिकेला चालु आर्थिक वर्षांत मिळकत कर वसुलीसाठी अखेरचे पंधरा दिवसच शिल्लक राहिले आहे. परंतु यंदा मिळकतीचे १ हजार ८१० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले असून, आता पर्यंत केवळ आकराशे कोटी जमा झाले आहेत. अखेरच्या पंधरा दिवसांत आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपये जमा होतील असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उद्दीष्टाच्या केवळ ७० ते ७५ टक्केच उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    शहरामध्ये सुमारे ९ लाख नोंदणीकृत मिळकती आहे. यामुळेच महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १ हजार ८१० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत सुमारे आकराशे कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे.  आठराशे कोटींचे असले तरी प्रशासनाला सुमारे पंधारे कोटी रुपये मिळकत करा मधून मिळतील असा अंदाज होता. परंतु आता बाराशे कोटींचा टप्पा पार करताना मिळकत कर विभागाची दमछाक झाली आहे. गत वर्षी महापालिकेला मिळकत करातून १ हजार ८४ कोटी रुपये मिळाले होते. मिळकत कर वसुलीसाठी प्रशासनाकडे आता शेवटचे पंधरा दिवस शिल्लक असून, आणखी शंभर ते दीडशे कोटी जमा होतील असे, मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. -------------------वर्षभरामध्ये ७०० व्यावसायिक मिळकती सीलमहापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासाठी अनेक मोहिम हाती घेतल्या. यामध्ये थकबाकी दारांच्या घरांसमोर बँड वाजविणे, थकबाकीदारांना नोटीसा देणे, नावे जाहिर करणे , मिळकती सील करणे, मिळकतीचा लिलाव करणे अशा अनेक प्रकारच्या कारवाई करण्यात येत आहे.  यामुळे गेल्या एक वर्षांत शहरातील सुमारे ७०० मिळकतींवर कारवाई करून सील करण्यात आल्या आहेत.--------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाIncome Taxइन्कम टॅक्स