शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार ढोलांवर पडणार टिपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:56 IST

गणेशोत्सवासाठी महापालिका करणार असलेल्या ढोलवादनाच्या जागतिक विक्रमासाठी गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर

पुणे : गणेशोत्सवासाठी महापालिका करणार असलेल्या ढोलवादनाच्या जागतिक विक्रमासाठी गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर २२ आॅगस्टला दुपारी ५ हजार वादक ढोलावर टिपरी टाकून परिसरातील गणेशाचे पुण्यात दणदणीत स्वागत करतील. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली.विद्यार्थ्यांनी स्वत: गणेशमूर्ती तयार करण्याचाही उपक्रम घेण्यात येणार आहे. तोही विक्रमच असेल. यापूर्वी २ हजार जणांनी मूर्ती तयार करण्याचा विक्रम आहे. महापालिका सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी मूर्ती तयार करतील, असे नियोजन महापालिका करत आहे. त्यासाठी शाळांशी संपर्क साधण्यात येत आहे. मूर्ती तयार होऊन ती वाळण्यासाठी व रंग देण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने हा उपक्रम लवकर घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शाळांचे परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे, असे महापौर म्हणाल्या.सदिच्छादूतासाठी सचिन तेंडुलकरसह आणखी काही वलयांकित व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. शहरात या काळात १२५ नामवंत कलाकार निमंत्रित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय अन्य अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. त्याचे नियोजनसुरू असल्याची माहितीमहापौरांनी दिली.सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव म्हणून महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. ढोलवादनाचा जागितक विक्रम हा त्याचाच एक भाग आहे. अशा उपक्रमांची गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे उपक्रमाच्या किमान २२ दिवस आधी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरातील विविध पथकांशी यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांची पथके तसेच त्याशिवाय अन्य युवक असे एकूण ५ हजार जण त्यादिवशी ढोलवादन करतील. स. प. महाविद्यालयाकडे मैदानाची मागणी करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.