शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग देखभालीची वाहतूक पोलिसांवर वेळ, ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:25 IST

पुणे-नाशिक मार्ग :

खेड : पुणे-नाशिक मार्गाची वाहतूककोंडी सोडविण्याबरोबरच या मार्गाची देखभाल करण्याची वेळही वाहतूक पोलिसांवर आली आहे. दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी रस्ता बांधणाऱ्या ठेकेदार कंपनीवर असतानाही त्यांच्या तर्फे केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रथम आयुक्तपद्मनाभ यांनी यावर तातडीने उपाय योजले. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पंधरा कर्मचारी व ट्रॅफिक वार्डन वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी नेमण्यात आले. १५ दिवसांत याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. धोरणात्मक उपाय आणि ठोस कारवाईने वाहतूककोंडी सुसह्य झाली. वाहतूककोंडीला फक्त जणू पोलीसच जबाबदार असल्याची धारणा झाली आहे. टोल वसूल करणारी आय आर बी कंपनी आणि महामार्ग विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महाळुंगे सर्कल येथील वाहतूक नियंत्रक दिवे बसवून ते पोलिसांनी सुरू करून घेतले. पूर्वी मंजूर झालेली येथील सिग्नल यंत्रणा उदासीनतेमुळे कार्यान्वित करण्यात आली नव्हती.चाकण-तळेगाव रस्त्यावर हिंदुस्थान पेट्रोलीयमच्या चौकात लवकरच सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.सर्व्हिस रस्ता आणि मुख्य रस्ता यातील दुभाजक नष्ट झाले होते. त्यामुळे वेडीवाकडी वाहने जात असत. वाहतूककोंडीस हे एक कारण होते. दुभाजकाचे हे दगड बसविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.त्याचबरोबर स्पायसर चौकातील वाहतूक नियंत्रक दिवाही सुरू करण्यातआला आहे. एकूणच पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाहतूककोंडीत लक्षणीय घट झाली आहे.

टॅग्स :Puneपुणे