शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता पण.... रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 15:30 IST

पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास गंगावणे कुटुंबासह करत होते.

ठळक मुद्देपोलिसांच्या तत्परतेमुळे गंगावणे कुटुंबावरील मोेठे संकट टळले.

पिंपरी : पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास गंगावणे कुटुंबासह करत होते. गर्दीमुळे पाय घसरून चिंचवड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म ३ वर पडल्या. त्याचवेळी प्रसंगावधान दाखवुन पी. टी. कर्दळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला बाहेर ओढले. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंगावणे कुटुंबावरील मोेठे संकट टळले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पुण्याहून लोणावळयाच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेमधून नीता संजय गंगावणे (वय ३१, रा. पनवेल),संजय रामचंद्र गंगावणे (वय ३९) हे दांपत्य मुलगा सिद्धार्थ (वय ८) याला बरोबर घेऊन प्रवास करत होते. चिंचवड येथील रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर प्रवाशांच्या झालेल्या गर्दीमुळे नीता गंगावणे यांचा पाय घसरला व त्या तोल जाऊन धावत्या रेल्वेखाली अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नीता गंगावणे यांना त्यांनी प्लॅटफॉर्मवरून लगेच बाहेर ओढले. काळ आला होता,पण वेळ आली नव्हती असेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. जीव वाचविण्यासाठी पोलिसांच्या रूपात प्रत्यक्ष ईश्वरानेच धाव घेतली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जीव वाचविल्याबद्दल नीता गंगावणे यांनी पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस