शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना चारा देण्याची वेळ

By admin | Updated: February 8, 2017 02:43 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी, बटाटा, वाटाणा आदी मालावर योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी, बटाटा, वाटाणा आदी मालावर योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी, जनावरांना खाद्य म्हणून घालत आहे. सध्या १ किलो कोबीला १ रुपया इतका बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सर्वच बाजूंनी अधिक अडचणीत सापडला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातून डिंभा उजवा कालवा व घोडनदी पाण्याने बारमाही वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी आदी गावांतील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात. वरील गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हिवाळी बटाटा लागवड केली आहे. बटाटा काढणीला सुरुवात झाली असून १० किलो बटाट्याला ४० रुपये इतका कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. केलेला खर्चही सुटत नाही. त्याचप्रमाणे पूर्व भागात कोबी, फ्लॉवरची मोठी लागवड झाली आहे. कोबीला एक एकरला साधारण ४० हजार रुपये इतका खर्च येत असून सध्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० किलो कोबीला १० रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने एकरी खर्च केला त्यापेक्षा निम्मा खर्चही वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबीपिक शेतातच सोडून दिले आहे, तर काही शेतकऱ्यांनी कोबी गायीचा चारा म्हणून शेतातून आणला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबीच्या उभ्या पिकात बकरे चरण्यासाठी सोडली असल्याचे पाहावयास मिळत आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. मार्चअखेर जवळ आल्याने सोसायट्या बँकेने वसुलीसाठी तगादा लावल्याने शेतकरी सगळीकडून आर्थिक अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)