शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर मिळणार रुग्णांना डॉक्टरांची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:41 IST

ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आहेत की नाही याची माहिती तसेच तपासणीसाठी अपॉर्इंटमेंट आता घरबसल्या घेता येणार आहे.

पुणे : ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आहेत की नाही याची माहिती तसेच तपासणीसाठी अपॉर्इंटमेंट आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांची माहिती राहणार असून, या अ‍ॅपवरच तपासणी रिपोर्टही रुग्णांना घरबसल्या मिळणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य केेंद्रे दिवसेंदिवस कात टाकत आहेत. या आरोग्य केंद्रांत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बरेचदा रुग्णांना दवाखान्यात डॉक्टर नसल्याने परत जावे लागते. तसेच त्यांना तपासणी रिपोर्टसाठीही ताटकळत बसावे लागते.रुग्णांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी भोर तालुक्यातील भोंगावली येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन एक अ‍ॅप विकसित केले होते. या अ‍ॅपवर रुग्णांना तपासणी अहवाल मिळत होता. याचे उद्घाटनही मोठ्या थाटात करण्यात आले होते. याच अ‍ॅपच्या धर्तीवर आता संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची पूर्ण माहिती असलेले अ‍ॅप जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विकसित करण्यात येणार आहे. या अ‍ॅपद्वारे घरबसल्या रुग्णांना डॉक्टर रुग्णालयात आहेत की नाही याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार त्यांना डॉक्टरांची अपॉर्इंटमेंटसुद्धा घेता येणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची वर्गवारी या अ‍ॅपवर राहणार असून, त्या त्या केंद्राच्या परिसरातील रुग्णांना त्यांच्या केंद्राची संपूर्ण माहिती अ‍ॅपवर मिळेल. तसेच आरोग्य विभागाच्या योजनांची माहितीही यावर देण्यात येणार आहे.यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण अ‍ॅपच्या माध्यमातून हायटेक होणार आहे. सध्या आरोग्य विभागातर्फे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे.या अ‍ॅपद्वारे येथील रुग्णांना त्यांचा तपासणी अहवाल मोबाइलवर मिळतो. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे अ‍ॅप सुरू आहे. या अ‍ॅपप्रमाणेच आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी उपयुक्त असलेले नवे आधुनिक अ‍ॅप विकसित करण्यात येत आहे.नागरिकांना घरबसल्या या अ‍ॅपचा वापर करून डॉक्टरांची वेळ घेता येईल. डॉक्टर उपलब्ध नसतील तर लाल रंगाचे चिन्ह आणि उपलब्ध असल्यास हिरव्या रंगाचे चिन्ह डॉक्टरांच्या नावापुढे असणार आहे. भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिनानिमित्त येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल राठोड, सुशांत मोहिते यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाºया रुग्णांना ओपीडी नंबर दिला जातो. या क्रमांकाद्वारे भविष्यात त्यांची माहिती अद्ययावत ठेवली जाणार आहे. त्यांच्यावर कुठले उपचार केले, त्यांना कुठली औषधे दिली हेही या क्रमांकामुळे समजणार आहे. पुढच्या वेळेला रुग्ण दवाखान्यात आल्यास त्यांना या क्रमांकाद्वारे त्यांची माहिती मिळणार आहे. ही सर्व माहिती आॅनलाईन असल्याने दरवेळी ओपीडीची कागदपत्रे त्यांना बाळगणे गरजेचे राहणार नाही. यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी या अ‍ॅपमध्ये राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.