शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदकेसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार उद्यापासून

By admin | Updated: April 26, 2017 04:08 IST

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून (दि. २७) रंगणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून (दि. २७) रंगणार आहे.बाबूराव सणस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या विजेतेपदाचा फैसला ३० तारखेला होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मल्लांची वजने होतील. शुक्रवारी राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेच्या उद्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ होईल. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होणार आहेत. लढतींना संध्याकाळी ४ नंतर प्रारंभ होईल, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड, काका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेसाठी २९ राज्यांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. हिंदकेसरी किताबविजेत्यास २.५० लाख रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येईल. स्पर्धेत एकूण १४ लाख ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हिंदकेसरी किताबासह (८२ ते १३० किलो) ५० वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा इतर सात विविध गटांत रंगणार आहेत. यात ५१ किलो, ५५ किलो, ६३ किलो, ६७ किलो, ७५ किलो, ८५ किलो व ८२ ते १०० किलो खुला गट व हिंदकेसरीचा खुला गट (८२ ते १३० किलो) या गटांचा समावेश आहे. याच वेळी ५० वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धादेखील होणार आहे.‘हिंदकेसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवीवर्ष आहे.१९९२ नंतर या महत्त्वाच्या टप्प्यावर पुन्हा हा मान आम्हाला मिळाला. आमच्यासाठी ही बाब खचितच आनंददायी आहे.(क्रीडा प्रतिनिधी)