शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

थरार! बिबट्याची झेप चुकली अन् तोंड डांबरी रस्त्यावर आपटलं , हल्ल्यातून युवक थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 08:34 IST

जुन्नर तालुक्यातील आंबेविहीर परिसरात बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री गाडीवरून चाललेल्या युवकावर बिबट्याने झेप घेतली पण...

पुणे, दि. 10 -  मंगरूळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री गाडीवरून चाललेले सीताराम लामखडे यांच्यावर बिबट्याने झेप घेतली. मात्र ती अयशस्वी झाली आणि लामखडे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या भागात बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावला आहे.आंबेविहीर परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरे व माणसांवर हल्ले सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी देखील किसन नलावडे यांची एक शेळी बिबट्याने भरदिवसा जागेवरच मारून टाकली तर आता बिबट्याने रात्रीच्या वेळी घरी दूध काढायला चाललेले सीताराम चंद्रकांत लामखडे यांच्या गाडीवरच बिबट्याने अचानक झेप घेतली. ते गाडी जोरात चालवीत असल्यामुळे बिबट्याची झेप मागच्या बाजुला गेली. त्यांच्या मागच्या डिक्कीला बिबट्याचा एक पंजा ओरखडला. त्यामुळे त्यांची गाडी डगमगली; त्यांनी मागे वळून पाहिले असता बिबट्या जाताना दिसले. झालेल्या प्रकारामुळे ते खूपच घाबरलेले होते. त्या बिबट्याचे तोंड डांबरी रस्त्यावर जोरदार आपटले. त्यानंतर बिबट्या वनखात्याच्या हद्दीत निघून गेला....अन् बिबट्याची झेप चुकलीअचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना काहीही सुचतच नव्हते. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच येऊन परिसरातील इतर लोकांना माहिती दिली. गाडी जोरात असल्यामुळेच बिबट्याची झेप चुकली.केवळ दैव बलवतर म्हणूनच ते बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले आहेत.या परिसरात सुभाष नढे यांच्या शेतात वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्याचे हल्ला सत्रसुरू झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेआहे.