शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाºयाची गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, या बंधाऱ्यातून हजारो लिटर रोज पाण्याची नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत.

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरला आहे. या बंधाºयाच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो एकर हेक्टर क्षेत्रावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. महिन्यापूर्वी या बंधाºयाला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाने यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रे पडली असून त्या वाटून पाण्याचे फवारे उडत आहेत. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले आहेत.पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे बसविले. मात्र, जीर्ण झालेल्या ढाप्यांवाटे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.बंधाºयाचा निखळला होता ढापामागील आठवड्यात बंधाºयाचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाईघाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाºयाच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली.मात्र, गळती थांबली नाही, या बंधाºयाला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांमधून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंट वाहून गेले आहे.ही गळती अशीच सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही होणारी पाण्याची गळती रोखणे गरजेचे बनले असून पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे