शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमध्ये दगड टाकून बंद करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:18 IST

सध्या दुष्काळामुळे जिल्हाभरातील दुष्काळसदृश तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

खोडद : सध्या दुष्काळामुळे जिल्हाभरातील दुष्काळसदृश तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दुष्काळाचा दाह अद्याप इतर तालुक्यांच्या तुलनेने कमी असलेल्या जुन्नरमधील खोडदमध्ये मात्र आहे ते पाणी शेतीला मिळण्यात अडचण यावी, यासाठी बोअरवेलमध्ये दगड टाकण्याचा प्रताप काही चोरट्यांनी केला आहे. शिवाय, त्याच शेतातील सुमारे सहाशे किलो डाळींबही चोरट्यांनी गेल्याच आठवड्यात चोरून नेली आहे.हिवरेतर्फे नारायणगाव येथील शेतकरी चंद्रशेखर अर्जुन कदम यांच्या शेतामध्ये हा प्रकार घडला आहे. त्याबाबत त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी चंद्रशेखर अर्जुन कदम यांची येथे माळवस्तीवर डाळींबशेती आहे. मागील आठवड्यात कदम यांच्या डाळिंबाच्या बागेतील सुमारे ६०० किलो डाळिंबांची चोरी केल्याचे निदर्शनास आलेआहे. विशेषत: तयार झालेल्या डाळींब हेरून चोरट्याने ती चोरली आहेत.>चोरी केल्यानंतर झाडावर डाळींब फळाला लावलेल्या कापडी पिशव्या शेतामध्ये अस्ताव्यस्त टाकून दिल्या. त्या पिशव्यांवरूनच कदम यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी इतर बागेत फिरून पाहणी केल्यावर सुमारे सहाशे किलो डाळींब चोरल्याचे लक्षात आले. त्यावर कदम यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र शेतात मचाण उभी करून त्यावरून गस्त घालण्याची व्यवस्था केली. मात्र ती गस्त चुकवून आज पुन्हा चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये मोठी दगड टाकून बोअरवेल बंद करण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही बाब कदम यांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.