शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोहितेवाडी-चिंचोशी रस्त्याचे ‘तीन तेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:52 IST

जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था वाईट : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मोहितेवाडी ते चिंचोशी रस्त्याचे ‘तीन तेरा’ झाले असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून, अपघातास निमंत्रण देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठ मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, वाहन चालविणे जिकिरीचे बनत चालले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे.

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाहून मोहितेवाडीमार्गे चिंचोशी, केंदूर, पाबळ आदी गावांकडे येणारे असंख्य प्रवासी ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत आहेत. तर कनेरसर येथील येमाई मातेच्या दर्शनासाठी येणारे असंख्य भाविकही याच मार्गावरून प्रवास करीत असतात; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला असून खड्डे पसरले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे असल्याने रस्ता आहे की पायवाट, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे; तसेच पावसाच्या पाण्याने या खड्ड्यांमध्ये डबके साचते.सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हा नागरिकांची; तसेच अन्य प्रवाशांची दळणवळणाची समस्या लक्षात घेऊन या नादुरुस्त रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच अनिल पोतले, माजी उपसरपंच शरद मोहिते, संचालक संजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्या सुनीता मोहिते, सागर पोतले, संदीप मोहिते, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष शरदचंद्र मोहिते, संचालक विलास मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, किसन पोतले, संजय हैबती मोहिते, अशोक मोहिते आदीसह अन्य स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मोहितेवाडी ते चिंचोशी हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी, भाविक, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. रस्तेदुरुस्ती विभाग रस्त्याच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविणे गरजेचे आहे.- विलास मोहिते, ग्रामस्थ मोहितेवाडी. 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा