शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

मोटारीच्या धडकेत तिघे गंभीर

By admin | Updated: September 13, 2016 01:21 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर आज सकाळी १० वाजता गंभीर अपघात घडला. सोलापूर बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आलेल्या प्रवासी वाहनांना धडक दिली.

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर आज सकाळी १० वाजता गंभीर अपघात घडला. सोलापूर बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आलेल्या प्रवासी वाहनांना धडक दिली. या अपघातात चार-पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मोटार (एमएच १४-डीएक्स ७९०१) घेऊन चालक दिलीप हरिभाऊ कुरे (रा. वाकड, ता. मुळशी) भरधाव वेगाने निघाला होता. या वेळी मोटारीने महामार्गावर पार्क केलेल्या ३ स्कॉर्पिओ, इर्टिगा, इंडिगो या गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये या गाड्यांचे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंढरपूरवरून इंडिका मोटार निघाली होती. अपघातप्रकरणी चालक कुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कुरे फरारी झाला आहे. या अपघातात इंडिकामधील गणपत सोपान देवकर, अर्जुन शिवराज भुजबळ, हनुमंत नातू भुजबळ (तिघे रा. पिंपरी चिंचवड) हे जखमी झाले आहेत. अपघातात नुकसान झालेल्या वाहनांवर महामार्गावर पार्किंग केल्या प्रकरणी भिगवण पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्ग असला तरी याचे भान येथील नागरिकांना तसेच हायवे प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना नसल्याचे चित्र आहे. या मुख्य रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग आणि व्यवसाय थाटले जातात. सोलापूर बाजूने पुण्याच्या बाजूने जाणाऱ्या वेगवान मोटारीच्या चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या चार-पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार-पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. हा अपघात रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या आणि रोडवर बसून भाजीपाला आणि फळे विकणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. चार रुपये कमाविण्याच्या हिशेबाने रस्त्यावरच संसार थाटणार आणि आपल्यासोबतच निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहेत.