शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तीन पल्सर दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:25 IST

तीनही दुचाकी पुणे शहर, जेजुरी आणि वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी करण्यात आल्या.

ठळक मुद्देया तीनही दुचाकींची साडेचार लाख रुपये किमतीचे हॅण्डल लॉक तोडून चोरी

पुणे: मंगळवार पेठ येथे नंबर प्लेट नसलेल्या तीन पल्सर दुचाकी गाड्या घेऊन संशयितरित्या उभ्या असलेल्या तीन व्यक्ती पेलिसांना आढळून आल्या. त्यांच्याकडे या दुचाकींबाबत पोलिसांनी चौकशी गेली असता तीनही दुचाकी पुणे शहर, जेजुरी आणि वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. वाहनचोरी प्रकरणी ऋषीकेश संजय मुळीक (रा.अनपटवाडी , ता.कोरेगाव, जि. सातारा), शुभम सनिल बोडरे (रा. आदर्की , ता. फलटण, जि.सातारा) आणि सुमीत नाना भंडलकर (रा. राजापूर, ता. भोर, जि.पुणे)असे अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मंगळवार पेठ येथे अटक करण्यात आलेले आरोपी पल्सर कंपनीच्या लाल, निळ्या रंगाच्या दुचाकी घेऊन उभे असलेले पोलिसांना आढळून आले. त्यासंबंधी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी वाहन चोरीची कबुली दिली. शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.    ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे ,पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस उपायुक्त समिर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम आणि दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, मेहबूब मोकाशी , सुभाष पिंगळे , राजू पवार, प्रकाश लोखंडे, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.