शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन दिवस होरपळीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:47 IST

उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र भाजून निघाला असून पुढील तीन दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र भाजून निघाला असून पुढील तीन दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्याला सर्वाधिक झळ बसली आहे. पश्चिम महाराष्ट्रही भाजून निघाला आहे. मुंबईकरदेखील यातून सुटले नसून उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी हाल झाले.राज्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशानी वाढला आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण कोरडे वारे, मान्सूनची खोळंबलेली प्रगती, राज्याच्या माथ्यावर असलेला सूर्य यामुळे राज्यभरातील कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या चार ते पाच वर्र्षांत प्रथमच मे अखेरीस तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंदमानामधे २० मेच्या सुमारास मान्सूनने हजेरी लावली. मात्र, अनुकूल वातावरण नसल्याने पुढील वाटचाल रेंगळली आहे. साधारण १५ मे नंतर कमाल तापमानात घट होत असते. मात्र, तापमानात घट होण्याऐवजी सूर्य पुन्हा आग ओकू लागल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.>राज्यावर जास्त दाबाचा पट्टा असल्याने जमिनी लगतची गरम हवा वर जात नाही. त्यामुळे विदर्भासह राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील.-अरविंद श्रीवास्तव, प्रमुख, जलवायू संशोधन-हवामान विभाग