शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 10:59 IST

एका ट्रकसह चोरी करण्यासाठी वापरण्यात येेणारी हत्यारे जप्त

लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील ३ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून एका ट्रकसह चोरी करण्यासाठी वापरण्यात येेणारी हत्यारे असा एकण १६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी  श्रीराम लाला  काळे (वय १९), दशरथ भिमा काळे (२१) व नाना गोविंद पवार (५६) तिघेही रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद ) यांना अटक करण्यात आली आहे.  जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  

त्यानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, काशीनाथ राजपुरे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, जनार्दन  शेळके, राजू मोमिन व धिरज जाधव पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे  येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आज रोजी विशेष पथकाला संशयित हे तेरखेडा ( ता. वाशी जि. उस्मानाबाद ) येथील असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. 

त्यानुसार पथकाने तेरखेडा येथील  फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना ३ जण  दिसून आले. संशय आल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची  कबुली दिली आहे. तसेच त्यांनी  इंदापूर, वालचंदनगर, नातेपुते, अकलूज परिसरातील ५ ठिकाणी गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे.  आहेत. या सर्व गुन्ह्यात मिळून एकूण १३ लाख ४० हजार रुपये किमतीचे १७ हजार ७१८ लिटर डिझेल चोरी केले आहे. यांतील दशरथ भिमा माने व त्याचे साथीदारावर रामदुर्ग, खानापूर, भेल गोल ( कर्नाटक ), शंखेश्वर, बार्शी, मिरज तासगाव, तसेच सांगली जिल्ह्यात डिझेल चोरी बाबतचे इतर ८ गुन्हे दाखल आहेत.