सायंकाळी व भल्या पहाटे नदीकाठावर राहाणाऱ्या अनेकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर यांचा व्हिडीओ ६ जून पासून व्हायरल झाला आहे. या संबंधात ओतूरचे वनपरिक्षत्र अधिकारी योगेश घोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे समजल्यावर ओतूर वनपरिक्षेत्रातील कार्यरत असणारे वनपाल, वनरक्षक यांना गस्त घालण्यासाठी त्वरित पाठविण्यात आले आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी स्मशानभूमी परिसरात पिंजराही लावला आहे त्याशिवाय नदीच्या पलीकडे जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या शेजारीही पिंजरा लावला आहे. पुलावरून डिंगोरे गावचे आमले शिवाराची नादकितांना मराडवाडी, आंबेदरा, नेहरकर वस्ती आहे येथील नागरिक दररोजच डिंगोरे, उदापूर, बनकरफाटा, ओतूर, मढ भागात दैनंदिन प्रवास होत असतो. वाड्या-वस्तीवरील महिला-पुरुष मोलमजुरीसाठी सकाळीच बाहेर पडतात त्यांना हा प्रवास डिंगोरे गावापर्यंत पायी करावी लागतो त्या नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. गेल्या वर्षी या भागात दुचाकी चालकावर हल्ले केले आहेत.
डिंगोरे येथील स्मशानभूमीत तीन बिबट्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST