शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

नाणे मावळमध्ये वीज पडून तीन ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:21 IST

अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

कामशेत - अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भातकापणी करीत असताना या तिघांवर काळाने घाला घातला.वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्यांमध्ये शोभा अंकुश शिरसट (वय ३२), खंडू धोंडू शिरसट (वय अंदाजे ५०, रा. दोघेही नेसावे, मावळ) यांचा समावेश आहे. तर साई कचरेवाडीत अंगावर वीज पडून सुनंदा भाऊ कचरे (वय ४०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनेत नाणेमावळातील तिघांना जीव गमवावा लागला. भात कापणीसाठी शोभा अंकुश शिरसट, अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट असे एकाच कुटुंबातील सदस्य गेले होते. अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट हे शेतात भात रचत होते. तर या वेळी अचानक आलेल्या वळवाच्या पावसापासून बचाव व्हावा म्हणून शोभा अंकुश शिरसट या वडाच्या झाडाखाली उभ्या होत्या. या वेळी खंडू धोंडू शिरसट झाडाखाली बसले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात शोभा अंकुश शिरसट व खंडू धोंडू शिरसट यांचा जागीचमृत्यू झाला.

टॅग्स :Puneपुणे